नवी दिल्ली - हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील दलित स्कॉलर रोहित वेमुला याच्या आत्महत्येला केंद्रीय मंत्री जबाबदार असल्याच्या काँग्रेसच्या आरोपानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी प्रथमच समोर आल्या आहेत. त्यांनी या प्रकरणाला दलित-दलितेतर असा रंग देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. पाच विद्यार्थ्यांवर केलेली निलंबनाची कारवाई योग्यच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यासोबतच, काँग्रेस खासदार हनुमंत राव यांनीही तसेच पत्र लिहिल्याचे त्या म्हणाल्या.
हनुमंत राव म्हणाले - दत्तात्रेय आणि माझ्या पत्रात अंतर
- काँग्रेस खासदार हनुमंत राव यांनी स्मृती इराणी यांनी दिलेल्या दाखला चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
- ते म्हणाले, बंडारू दत्तात्रेय आणि माझ्या पत्रात फार फरक आहे.
- मी चुकीचे काम थांबवण्यासाठी पत्र लिहिले असल्याचे राव म्हणाले.
काय म्हणाल्या स्मृती इराणी
- रोहित वेमुलाच्या सुसाइड नोटमध्ये कोणाचाही उल्लेख नाही.
- विद्यार्थी आत्महत्येला जातीय रंग देणे चुकीचे
- विद्यार्थ्यांवर केलेली कारवाई योग्यच.
दुसरीकडे, ज्यांच्या पत्रानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठाला पत्र पाठवले असा आरोप आहे, त्या केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी बुधवारी निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की विद्यापीठ ही स्वायत्त संस्था आहे. मी त्यांच्यावर दबाव आणलेला नाही.
तर, विद्यापीठाचे कुलगुरु अप्पा राव यांनी आज एका टीव्ही चॅनलसोबत बोलतांना सांगितले, की मी विद्यार्थींची शिक्षा कमी करण्याचे प्रयत्न केले. केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयाच्या पत्राला विद्यापीठाने उत्तर ही दिले नाही. विद्यापीठावर कोणाचाही दबाव नव्हता.
पुढील स्लाइडमध्ये, काँग्रेसच्या आरोपावर काय म्हणाल्या स्मृती इराणी