नवी दिल्ली - बिहारच्या एका मंत्र्याने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना 'डियर' म्हटल्यानंतर सोशल मीडियावर यावर बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर या वादाला स्मृती यांनी एका कॉलममधून उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, 'भलेही मला अँटी नॅशनल म्हणा, मी टीकेचा सामना करण्यास तयार आहे, त्यापासून पळ काढणार नाही.'
आणखी काय म्हणाल्या स्मृती
>> भाजपशी संबंधीत वेब मॅग्झिन thenamopatrika.com साठी लिहिलेल्या लेखात स्मृती इराणींनी 'डियर' वादावर आणखी चर्चा केली आहे.
>> त्या म्हणाल्या, की मुली लहान असतात तेव्हापासून त्यांना प्रत्युत्तर देण्यापासून रोखले जाते. यामुळे पुरुष आणि मुलांना काहीही फरक पडत नाही. त्यांनी मुलींना कितीही अपमानीत केले तरी त्यांना त्यामुळे काही होत नाही.
>> 'मात्र एखाद्या मुलीने उलटून उत्तर दिले तर तिला 'अगाऊ' म्हटले जाते.'
>> 'प्रश्न हा आहे की मुलींनी उलट उत्तर का देऊ नये ? त्यांनी कायम शांत का बसावे ? '
>> स्मृती म्हणाल्या, 'मला तुम्ही अँटी नॅशनल म्हणा, त्याने मला काहीही फरक पडत नाही. मी टीकेचा सामना करु शकते, त्यापासून पळ काढणार नाही.'
ट्विटरवर असा सुरु झाला वाद
>> बिहारचे शिक्षण मंत्री अशोक चौधरी यांनी नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यावरुन स्मृती इराणींना 'डियर' संबोधत प्रश्न उपस्थित केला होता.
>> चौधरी यांनी त्यांच्या प्रश्नाची सुरुवात डियर शब्दाने केल्याने स्मृती भडकल्या होत्या. त्यांचा त्या शब्दाला आक्षेप होता. त्यानंतर यूजर्सही त्यांच्यावर भडकले होते.
>> अशोक चौधरींनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते, 'डियर स्मृती इराणीजी.. कधी राजकारण आणि भाषणातून वेळ मिळाला तर शैक्षणिक धोरणाकडेही लक्ष्य द्या.'
>> 'डियर स्मृती इराणीजी आम्हाला नवे शैक्षणिक धोरण केव्हा पाहायला मिळेल ? तुमच्या कॅलेंडरमधील 2015 केव्हा संपणार आहे? '
>> यावर स्मृतींनी त्यांच्या पोस्टमधून उत्तर दिले होते, 'महिलांना 'डियर' म्हणून संबोधण्यास केव्हापासून सुरुवात झाली अशोकजी ?'
(
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या
Whatsapp आणि
Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)