आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना’; मोदींचा विश्वास कायम, स्मृतींचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फेरबदलात मनुष्यबळ विकास मंत्रालयाऐवजी वस्त्रोद्योग मंत्रालय मिळालेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी, ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना,’ अशी प्रतिक्रिया दिली. वस्त्रोद्योग मंत्रालयाचा कार्यभार म्हणजे पंतप्रधान आणि पक्ष यांनी माझ्या कार्यक्षमतेवर दाखवलेला विश्वासच आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

स्मृती इराणी यांनी बुधवारी वस्त्रोद्योग मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीवर जास्त लक्ष केंद्रित करता यावे म्हणून तुमचे खाते बदलण्यात आले आहे का, या पत्रकारांच्या प्रश्नावर इराणी यांनी ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना,’ अशी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ‘वस्त्रोद्योग मंत्रालयासाठी ६ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्यात आले आहे. अशा वेळी ही संधी मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. देशासाठी तयार केलेल्या आराखड्याची अंमलबजावणी करण्याची क्षमता माझ्यात आहे, हा विश्वास पक्षाने दर्शवला आहे हे त्यावरून दिसते.’ मंत्रालय सोपवण्याच्या निर्णयामागे भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे आहेत का, या प्रश्नावर त्यांनी,‘हा पक्षाचा निर्णय असतो,’ असे सांगितले.
पुढे वाचा, स्मृतींच्या खातेबदलाबाबत काय म्हणाला कन्हैयाकुमार.. जावडेकरांनी काय केले पहिल्या दिवशी

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...