आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Live Action: स्मृती इराणी पुढे पुढे, कॅमेरा मागे मागे; पुन्हा आल्या चर्चेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी सध्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. गोव्याच्या फॅबइंडिया शोरुममधील कॅमेरा पकड मोहिमेमुळे स्मृती इराणींची सध्या चांगलीच चर्चा आहे. मात्र ही पहिलीच वेळ नाही जेव्हा स्मृती इराणी यांना चांगली टीआरपी मिळत आहे. छोट्या पडद्यावरील ही सुन कॅमेरा फेस करण्याच्या कलेमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे.

स्मृती इराणीची राजकारणातील एन्ट्रीच सर्वात विवादाची होती. पंतप्रधान नरेंदरर मोदींनी स्मृती इराणी यांना जेव्हा मनुष्यबळ विकास मंत्री बनवले तेव्हापासूनच त्या चर्चेत राहिल्या. अमेठीत राहुल गांधी आणि कवी कुमार विश्वास यांच्याविरूध्दची लढत असो अथवा प्रियंका गांधींच्या पीएसोबत ऑनकॅमेरा झालेला वाद असो, यावरून हे स्पष्ट झाले आहे की, स्मृती इराणीला कॅमेऱ्यासमोरील एक्शनचे गणित चांगलेच जमते. त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की, टीआरपी कशी मिळवतात आणि चर्चेत कसे राहतात.

Divyamarathi.com तुमच्यासमोर स्मृतीच्या टीआरपीच्या कलेचा एक ओझरता आढावा मांडणार आहे, ज्यामुळे स्मृती कॅमेरा पाहताच अॅक्शनमध्ये येतात आणि वाद त्यांच्यासोबत चालायला लागतात.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, या गोष्टींमुळे चर्चेत राहिल्या स्मृती इराणी