आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मृतींच्या खाते बदलावर JDU खासदारांची आक्षेपार्ह कॉमेंट, आप नेत्याने म्हटले निषेधार्ह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मृती इराणी यांच्याकडून मनुष्यबळ विकास खाते काढून घेण्यात आले. - Divya Marathi
स्मृती इराणी यांच्याकडून मनुष्यबळ विकास खाते काढून घेण्यात आले.
नवी दिल्ली - मोदी सरकारमधील मंत्री स्मृती इराणी यांचे खातेबदल झाल्यानंतर जनता दल संयुक्तचे खासदार अली अनवर यांनी आक्षेपार्ह कॉमेंट केली आहे. अनवर यांना जेव्हा स्मृती यांचे मंत्रालय बदलण्यात आले त्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली, ते म्हणाले -'बरे झाले आता स्मृती यांना कपडा मंत्रालय देण्यात आले, आता कमीत कमी अंग झाकण्याचे तरी काम होईल.' त्यांच्या या वक्तव्याचा आम आदमी पार्टी नेते कुमार विश्वास यांनी त्यांचे नाव न घेता समाचार घेतला.
दुसरीकडे, फेरबदलात मनुष्यबळ विकास मंत्रालयाऐवजी वस्त्रोद्योग मंत्रालय मिळालेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी, ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना,’ अशी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले होते अनवर
> बुधवारी एका चॅनलच्या प्रतिनिधीने जेडीयू खासदार अली अनवर यांना स्मृती इराणी यांचे मंत्रालय बदलले जाण्यावर प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना अली म्हणाले, 'बरे झाले स्मृतींना वस्त्रद्योग मंत्रालय देण्यात आले. कमीत कमी अंग झाकण्याच्या तर कामी येईल. येथे त्या वाद तर घालणार नाहीत.'
> अनवर यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिले होते.
> अनवर यांच्या वक्तव्याला आप नेते कुमार विश्वास यांनी असभ्य आणि निषेधार्ह्य टिप्पणी म्हटले आहे.

अखेर का बदलले स्मृतींचे मंत्रालय
भाजपाध्‍यक्ष अमित शहा हे इराणी यांच्‍या कामकाजावर समाधानी नव्‍हते. शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटत होते की, स्मृतीसंदर्भातील वादांमुळे त्‍यांच्‍या कामावर परिणाम होत आहे. बुधवारी स्मृती यांनी त्‍यांचे नवीन ऑफिस जॉइन केले. त्‍यांचे खाते बदलण्‍यात आल्‍याने माध्‍यमांशी बोलताना त्‍या म्हणाल्‍या की, ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना.’
पुढील स्लाइडमध्ये, आप नेत्यांचे ट्विट...
> स्मृतींच्या खातेबदलावर काय म्हणाला कन्हैय्याकुमार
बातम्या आणखी आहेत...