आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smriti Irani To Lead 'Swachch Bharat' Campaign Of HRD Ministry

मोदींच्या आधी स्मृती इराणींनी उचलला झाडू, 'स्वच्छ भारत - स्वच्छ विद्यालय' अभियान सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी आणि त्यांच्या मंत्रालयातील अधिकार्‍यांनी गुरुवारी 'स्वच्छ भारत - स्वच्छ विद्यालय' अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत त्यांनी दिल्लीच्या सर्व केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयांमध्ये स्वच्छता अभियानात भाग घेतला.
स्मृती इराणी यांनी हातात झाडू घेऊन शाळांमध्ये स्वच्छता केली. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षण सचिव राजश्री भट्टाचार्य याही स्वच्छता अभियानात सहभागी झाल्या. त्यांनी आर.के.पुरम येथील केंद्रीय विद्यालयात आयोजित स्वच्छता अभियानात भाग घेऊन शाळेची स्वच्छता केली. तर, त्यांच्या मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी इतर शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबवले.
केंद्र सरकार देशभरात गांधी जयंतीपासून ( 2 ऑक्टोबर) क्लिन इंडिया अभियान सुरु करणार आहे. मंगळवारी बंगळुरु येथे पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना संबोधीत करताना म्हटले, 'मी स्वतः गांधी जयंतीच्या दिवशी हातात झाडू घेणार आहे. माझी देशातील लोकांना 100 तासांची भिक्षा मागणार आहे. त्यांनी देशासाठी 100 तास द्यावे आणि स्वच्छता अभियानात भाग घ्यावा. मी सर्वसामान्य घरातून आलो आहे, आणि छोटा माणूस आहे. मी लहान-लहान माणसांची लहान-लहान कामे करणार आहे.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी अमेरिकेला रवाना होणार आहेत, त्याआधी त्यांनी मेक इन इंडिया अभियान सुरु केले आणि परतल्यानंतर दोन दिवसांनी ते स्वच्छ भारत अभियान सुरु करणार आहेत.
पुढील स्लाइडमध्ये छायाचित्रातून पाहा, स्मृती इराणी यांनी सुरु केलेले 'स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय अभियान'