आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणमंत्र्यांनी ट्विट केले, ‘डियर स्मृती इराणीजी...’ आणि भडकले शाब्दिक युद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा/ नवी दिल्ली- केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींना बिहारचे शिक्षणमंत्री अशोक चौधरी यांनी ट्विटरवर ‘डियर’ म्हटल्यामुळे दोघांत जोरदार शाब्दिक चकमक झडली. या शाब्दिक फैरींदरम्यान शिष्टाचाराचा मुद्दाही डोकावला.

मोदी सरकारच्या विकास पर्वानिमित्त सध्या बिहारच्या दौऱ्यावर असलेल्या इराणींना चौधरींचे ‘‘डियर स्मृती इराणीजी’’ हे संबोधन पचनी न पडल्याने हा वाद पेटला. चौधरी हे बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

इराणींच्या आक्षेपानंतर ‘अनादर नव्हे तर सन्मान म्हणून ‘डियर’ म्हणालो. व्यावसायिक चर्चेचा प्रारंभ ‘डियर’ शब्दानेच होतो. इराणीजी तुम्ही कधी तरी मुद्यावर बोला. उगाच घूमवू नका.’ असे चौधरींनी प्रत्युत्तर दिले. त्यावर इराणींनी ‘अशोक चौधरीजी, तुमच्याशी व इतरांशीही माझा संवाद ‘आदरणीय’ शब्दाने सुरू होतो. तुम्ही मुद्दाच काढला आहे तर शैक्षणिक धोरणावर ना राज्याने अभिप्राय दिला, ना तुम्ही. आपल्या थेट भेटीतही तुम्ही सूचना केलेल्या नाहीत,’असे ट्विट करून चौधरींच्या प्रश्नाला इराणींनी उत्तर दिले.

स्मृती इराणीजींनी मोदींकडून बरेच काही शिकले आहे.... खोटी आश्वासने आणि आपल्या नाकर्तेपणाचा दोष दुसऱ्यांवर थोपवणे हा संघाच्या पुस्तकातील पहिला धडा आहे...’ असा हल्ला चौधरींनी चढवला. बैठकीतील मिनिट्स जाहीर करा. ‘दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा’ असे आव्हानही त्यांनी दिले. इराणींनीही त्यावर ‘सर, तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढाल व शैक्षणिक धोरणात योगदान द्याल, हीच अपेक्षा, असे ट्विट केले. मग चौधरींनी ‘आदराबद्दल धन्यवाद. शैक्षणिक धोरण जाहीर करणे न करणे माझ्यावर अवलंबून आहे, हे जाणून अत्यानंद झाला. मोदीजी त्याचे श्रेय मलाही देतील, हीअपेक्षा,’ असा चिमटा काढला.

हे शाब्दिक युद्ध एवढ्यावरच थांबले नाही. ‘२ लाख शिक्षकांच्या रिक्त जागा भरा. केंद्रीय विद्यालय व मोतिहारी केंद्रीय विद्यापीठाला जागा द्या’ असा सल्ला इराणींनी दिला. त्यावर चौधरी म्हणाले,‘माझी आश्वासने कशी पूर्ण करायची हे मला माहीत आहे. तुम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करा, अशी विनंती आहे.’

अशी पडली वादाची ठिणगी.. अन् नंतर उडाला भडका

‘डियर स्मृती इराणीजी, नवीन शैक्षणिक धोरण कधी येणार? तुमच्या कॅलेंडरमध्ये २०१५ हे वर्ष कधी संपणार? राजकारण, भाषणबाजीऐवजी शैक्षणिक धोरणावर लक्ष द्या.’
- बिहारचे शिक्षणमंत्री अशोक चौधरी यांचे ट्विट

‘महिलाओं को डियर कहके कब से संबोधित करने लगे अशोकजी?’ तुमच्याशी आणि इतरांशीही माझा कार्यालयीन संवाद ‘आदरणीय’ या शब्दानेच सुरू होत असतो.’
- मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींचे रिट्विट

एकमेकांना घेरण्‍याचा प्रयत्‍न..
- दोन्‍ही मंत्री या वादानंतर थांबले नाहीत. त्‍यांनी एकमेकांना घेरण्‍याचा प्रयत्‍न केला.
- स्मृती यांनी शिक्षण धोरणावर पलटवार करताना म्‍हटले की, "बिहार एकटे असे राज्‍य आहे. ज्‍याने कधी ग्राउंड लेवलवर चर्चा केली नाही."
- चौधरी म्‍हणाले, "मी आपल्‍याला अपील करतो की, आपल्‍या मिटींगला लोकांपर्यंत येऊ द्या. 'दूध का दूध, पानी का पानी' होऊ द्या."
- स्मृती म्‍हणाल्‍या, "जर तुम्‍हाला खरच शिक्षण धोरणाविषयी चिंता असेल तर, तुमच्‍या व्‍यस्त शेड्यूलमधून थोडासा वेळ काढा."
चौधरी यांनी मोदींवरही साधला नेम..
- बिहारचे मंत्री चौधरी यांनी ईराणी यांच्‍या बहाण्याने मोदींवरही नेम साधला, ते म्‍हणाले- "आपण (स्मृति) कधी पीएम नरेंद्र मोदी यांच्‍याप्रमाणे खोटी आश्‍वासने देण्‍याची कला तर शिकल्‍या नाही."
- चौधरी असेही म्‍हणाले की, स्मृती यांना त्‍यांच्‍या मिनिस्ट्रीबाबतही माहिती नाही.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, ट्विटरवरुन असा झाला वाद..