आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृती इराणींच्या पदवीची होणार पडताळणी, न्यायालयाने मागवली कागदपत्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेसंबंधींची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिल्ली न्यायालयाने निवडणूक आयोग व दिल्ली विद्यापीठाला (डीयू) दिले आहेत. इराणी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात चुकीची शैक्षणिक पात्रता सांगितल्याची तक्रार करण्यात आली आहे.

महानगर दंडाधिकाऱ्यांनी इराणींच्या शैक्षणिक पात्रतेविषयीची सर्व कागदपत्रेे सादर करण्याच्या आदेशानंतर निवडणूक आयोग व दिल्ली विद्यापीठाने अर्धवटच कागदपत्रे सादर केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ मे रोजी आहे. इराणी यांनी २००४, २०११ आणि ११ मध्ये दाखल केलेल्या त्यांच्या निवडणूक शपथपत्रात शैक्षणिक पात्रतेची माहिती हेतुत: चुकीची भरून फसवणूक केल्याची तक्रार मुक्तलेखक अहमेर खान यांनी केली होती.
इराणी यांनी हेतुत: खोटी शैक्षणिक पात्रता लिहिल्यामुळे भारतीय दंड विधान आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२४ अ अन्वये शिक्षेसपात्र गुन्हा आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे. कलम १२४ अ मध्ये चुकीची माहिती दिल्यास सहा महिने तुरूंगवास किंवा दंड किंवा दोन्हीच्या शिक्षेची तरतूद आहे.
इराणींचा शैक्षणिक घोळ
इराणींच्या एप्रिल २००४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या शपथपत्रात दिल्ली विद्यापीठातून १९९६ मध्ये बी.ए., २०११ च्या राज्यसभा निवडणूक शपथपत्रात दिल्ली विद्यापीठातून बी. कॉम. तर २०१४ च्या लोकसभा निवडणूक शपथपत्रात येथूनच बी. कॉम. पार्ट-१ पूर्ण केल्याचे म्हटले आहे.