आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसएमएस चॅटने पत्र, लेखनकला संपवली; व्ही. ए. शिवा अय्यादुराई यांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पत्र प्रपंचाला प्राचीन संस्कृतीचा वारसा असला तरी अब्जावधी लोकांनी आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील लेखनाला प्राधान्य दिल्यामुळे ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एसएमएस चॅटने पत्र संस्कृतीला नष्ट केले आहे, असा दावा इ-मेलचा शोधकर्ता व्ही. ए. शिवा अय्यादुराई यांनी केला आहे.

पत्र लेखनाला जागतिक पातळीवर मान्यता मिळवून देण्याचे काम इ-मेलद्वारे झाले आहे. काही दशकांपूर्वी लेखनाचे काम शिकलेल्या र्मयादित लोकांकडून केले जात होते. अर्थात शिक्षण घेण्याची क्षमता असलेल्यांचा त्यावर अधिकार होता. परंतु सध्या मात्र अब्जावधी लोक इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचे लेखन करण्यावर भर देतात. त्यामुळे सध्या लेखनाच्या दर्जाचा मोठा दावा केला जातो, असे 50 वर्षीय एमआयटी व्यवस्थापन संशोधक, तंत्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ अय्यादुराई यांनी म्हटले आहे. इ-मेल हा एखाद्या मजकुराचे इलेक्ट्रॉनिक रूपांतर होते. मेल व्यवस्था औपचारिक पत्र किंवा मेमो संवादासाठी वापरली जायची. परंतु एसएमएसने ही व्यवस्था नष्ट केली. टेक्स्टिंग, एसएमएस, चॅट, ट्विटर इत्यादी संवाद साधनातून अनौपचारिक व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे मत अय्यादुराई यांनी व्यक्त केले.

पत्रलेखनाला प्राधान्य
टेक्स्टिंग आणि चॅटने ‘पत्र लेखना’ची कला संपवली आहे. कारण पूर्वीच्या पत्राचे इलेक्ट्रॉनिक रूपांतर म्हणून ई-मेलकडे पाहिले जाईल, असे भाकीत आपण 1978 मध्ये केले होते. त्यामुळेच पत्रलेखनासाठी पर्याय म्हणून ई-मेलला प्राधान्य देण्यात येत होते. परंतु एसएमएसने या माध्यमाचे काही प्रमाणात नुकसान केले आहे. ई-मेलने संवादाची पद्धत बदलून टाकली होती, असे निरीक्षण अय्यादुराई यांनी मांडले आहे.

अय्यादुराईंचा शोध कधी ?
अय्यादुराइ यांनी 1978 मध्ये पहिल्यांदा ई-मेल विकसित केला. त्या वेळी त्यांचे वय केवळ 14 वर्षांचे होते. या शोधाबद्दल त्यांना अमेरिकेकडून पहिल्यांदा ई-मेलचा कॉपीराइट प्रदान करण्यात आला.

क्लिंटन यांचे व्यवस्थापन
अय्यादुराई यांनी क्लिंटन राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या प्रशासनासाठी ई-मेल व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली होती. एटी अँड टी, टोयोटा या कंपन्यांसाठीही अय्यादुराई यांनी काम केले होते.