आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे लेट झाल्यास तासभर आधी एसएमएसद्वारे सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्वेस उशीर होत असल्यास प्रवाशांना एसएमएसने सूचना देण्याच्या व्यवस्थेवर रेल्वे विचार करत आहे. रेल्वे महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बैठकीत सांगितले की, ‘रेल्वे उशिरा येणार असेल आणि त्यादरम्यान आपण प्रवाशांना सुविधा देऊ शकत नसू तर, किमान रेल्वे लेट असल्याची सूचना एसएमएसने द्यायला हवी.’ 
 
यानंतर रेल्वे प्रशासन अशी यंत्रणा बनविण्याच्या तयारीस लागले. त्यामुळे आता प्रवाशांना एक तास आधीच रेल्वे लेट होणार आहे याची माहिती मिळेल. सध्या फक्त विमान कंपन्या प्रवाशांना तशी सुविधा देत आहेत. रेल्वेगाड्या किती विलंबाने धावत आहेत आणि परिस्थिती कधी सामान्य होईल या प्रश्नाच्या उत्तरात रेल्वेचे महासंचालक (पीआर) अनिल सक्सेना यांनी सांगितले की, अलीकडेच परिचालनाचा स्तर ६५ टक्क्यांपर्यंत होता. तो पुन्हा ७३- ७६ टक्क्यांपर्यंत झाला आहे. लवकरच आम्ही तो ८० टक्क्यांवर नेऊ.
बातम्या आणखी आहेत...