आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍नॅपडीलच्या 600 कर्मचार्‍यांच्या नोकरीवर येणार गंडांतर; नफा वाढवण्‍यासाठी कंपनीने उचलले पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन वर्षात नफा कमावणारी देशातील पहिली ई-कॉमर्स कंपनी बनण्‍याचे कंपनीचे उद्दीष्‍ट आहे. - Divya Marathi
दोन वर्षात नफा कमावणारी देशातील पहिली ई-कॉमर्स कंपनी बनण्‍याचे कंपनीचे उद्दीष्‍ट आहे.
नवी दिल्‍ली - देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी स्‍नॅपडील आपल्‍या 600 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकणार आहे. कंपनीला प्रॉफिटेबल बनवण्‍यासाठी हे पाऊल उचलण्‍यात आल्‍याचे कंपनीतर्फे सांगण्‍यात आले आहे.
 
यामुळे कंपनीतील 'ई-कॉमर्स', 'लॉजिस्‍टीक' आणि 'पेमेंट्स ऑपरेशन्‍स' या विभागातील कर्मचाऱ्यांच्‍या नोकरीवर गंडांतर येणार आहे. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनूसार याची प्रक्रीया मागील आठवड्यातच सुरु झालेली आहे. सध्‍या स्‍नॅपडीलमध्‍ये 8000 कर्मचारी आहेत. 

कंपनीचे उद्दीष्‍ट, व्‍यवसाय वाढवणे 
- स्‍नॅपडीलच्‍या प्रवक्त्‍याने सांगितले आहे की, 'दोन वर्षात नफा कमावणारी देशातील पहिली ई-कॉमर्स कंपनी बनण्‍याचे आमचे उद्दिष्‍ट आहे. यासाठीच हे महत्‍तवपूर्ण पाऊल उचलण्‍यात आले आहे.'   
- आम्‍हाला कंपनीची कार्यक्षमता टिकवून ठेवायची आहे. जेणेकरुन ग्राहकांना गुणवत्‍तापूर्ण उत्‍पादने आणि चांगली सेवा देता यावी. 
- 'हाय क्‍वॉलिटी ग्रोथ'च्‍या उद्दीष्‍टाला पूर्ण करण्‍यासाठी कंपनीने आपली एक टीमदेखील बनविली आहे, अशी माहिती कंपनीच्‍या प्रवक्‍याने दिली. 
 
नफा वाढवण्‍यासाठी याआधीही उचलली आहेत पाऊले
- स्‍नॅपडिलने आपला व्‍यवसाय वाढवण्‍यासाठी याआधीही अनेक पाऊले उचलली आहेत. 
- यामुळे स्‍नॅपडिलची डिलिव्‍हरी कॉस्‍ट 35 टक्‍क्याने कमी झाली. 
- कंपनीला आशा आहे की, 2017 या आर्थिक वर्षात कंपनीच्‍या निव्‍वळ महसूलात 3.5 टक्‍क्‍याने वाढ होईल. 
 
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट देत आहे टक्‍कर 
- प्रवक्‍त्‍याने सांगितले आहे की, कंपनीचे लॉजिस्‍टीक व्‍हेंचर 'वूलकन एक्‍सप्रेस' या वर्षीच्‍या मध्‍यापर्यंत नफा कमवू लागेल. 
- भारतात स्‍नॅपडिलला अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टकडून जोरदार आव्‍हान मिळत आहे.
- यामुळे स्‍नॅपडिलला भांडवल उभे करण्‍यात अडचणी निर्माण होत आहेत.    
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
 
बातम्या आणखी आहेत...