आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SNDT FIrst Woman University, Riebleli University Not Ram Naik

एसएनडीटीच पहिले महिला विद्यापीठ, रायबरेली येथील विद्यापीठाचा दावा फोल- राम नाईक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा मतदारसंघ रायबरेलीत उभारण्यात येणारे महिला विद्यापीठ देशातील पहिले असल्याचा दावा खोटा असून पुणे येथे 1916 मध्ये स्थापन झालेले एसएनडीटी हेच अशा प्रकारचे पहिले विद्यापीठ आहे, असे भाजप नेते राम नाईक यांनी म्हटले आहे. सरकारला याचा विसर पडला असून मतांसाठीच ही खेळी आहे, अशी टीका नाईक यांनी केली. देशाच्या शिक्षण क्षेत्रातील गौरवशाली घटना केंद्रीय कॅबिनेटच्या विस्मरणात कशी काय जाते, असा सवाल नाईक यांनी केला.


सावित्रीबाईंचे नाव द्या
इंदिरा गांधी यांच्या नावे अनेक प्रकल्प आहेत. त्यामुळे रायबरेली विद्यापीठाला सावित्रीबाई फुले, भगिनी निवेदिता, आनंदी जोशी किंवा रमाबाई रानडे यांच्यापैकी नाव द्यावे, अशी मागणी नाईक यांनी केली. या थोर महिलांनी स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली असल्याचा दाखला नाईक यांनी दिला.


मनमोहन कसे विसरले
एसएनडीटी विद्यापीठच नव्हते, तर महिला सक्षमीकरणाची पायाभरणी करणारी ती संस्था होती. त्यामुळे अशा संस्थेचा विसर विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष राहिलेल्या पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही
पडावा याचे आश्चर्य वाटते, असे नाईक म्हणाले.


एसएनडीटीचा गौरवशाली इतिहास
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ‘द इंडियन वुमन्स युनिव्हर्सिटी’ची स्थापना केली. पुढे 1951 मध्ये विद्यापीठाचे नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असे करण्यात आले. 1939 मधील पदवीप्रदान समारंभाला महात्मा गांधींची उपस्थिती होती. पुढे विद्यापीठ सुवर्णमहोत्सवाला इंदिरा गांधी याही उपस्थित राहिल्या होत्या.