आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णा आता मोदी सरकारविरुद्ध आंदोलन छेडण्याच्या तयारीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे लोकपालच्या मुद्द्यावरून आता मोदी सरकारविरुद्ध आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. मोदी सरकार भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अण्णा म्हणाले की, लोकपाल विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन ३६५ दिवस उलटले. तरीही केंद्र सरकारने पूर्णपणे लोकपाल लागू केला नाही. केंद्र भ्रष्टाचाराच्या प्रकरणांबाबत गंभीर नाही. यामुळे आपण नव्याने लोकपाल विधेयक, काळ्या पैशाविरुद्ध आंदोलन करू. काळा पैसा परत आणल्यानंतर प्रत्येक देशवासीयांच्या खात्यात १५ लाख रुपये येतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. मात्र, आजवर १५ रुपयेही मिळालेले नाहीत. सरकारचा भूसंपादन कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध असल्याचे हजारे यांनी सांगितले. दरम्यान, अण्णांनी भाजपच्या किरण बेदी आणि आपच्या अरविंद केजरीवाल यांच्याबाबत वक्तव्य करण्यास नकार दिला.