आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकार्‍यांसाठी यापुढे सोशल मीडियाची परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकारच्या 38 मंत्रालयांच्या सोशल मीडियाशी संबंधित अधिकार्‍यांना सोशल मीडियाची परीक्षा द्यावी लागणार आहे. 11 जुलै रोजी यासंबंधीचा विशेष वर्ग आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर अधिकार्‍यांची परीक्षादेखील घेतली जाणार आहे.

सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर सरकारची बळकट हजेरी लावण्यासाठी हा वर्ग आयोजित करण्यात आला आहे. त्या दृष्टीने अधिकार्‍यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. 38 मंत्रालयांनी अधिकार्‍यांची यादी उपलब्ध करून दिली आहे.

ई-विश्व आणि सरकार
मोदी सरकार इंटरनेटवर सातत्याने आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार 500 कोटी रुपयांच्या डिजिटल इंडिया प्रोग्रामवर काम करत आहे. त्यासाठी देशातील नागरिक आणि विशेषत: तरुणांना कॉम्प्युटर साक्षर बनवण्यात येणार आहे. दुसरी योजना ई-क्लास रूमची आहे. त्यासाठी देशातील ऑनलाइन कोर्स आणि अभ्यासक्रमातही व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्यात येणार आहे.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)