आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचारात सोशल मीडिया, चाय, रोड शो, हँगआऊटचा जोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - यंदाची निवडणूक प्रचाराच्या बाबतीत विशेष म्हणावी लागेल. कारण पूर्वी केवळ जनसंपर्काचे साधन होते. परंतु यावेळी सोशल मीडिया, रोड शो, गुगल हँगआऊट आणि चाय यावर चर्चा होऊ लागली आहे. प्रत्येक मार्गाने पक्ष लोकांना जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

काँग्रेसने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या धर्तीवर प्रायमरीज केले. 16 जागांवर कार्यकर्त्यांनी उमेदवारांची निवड केली. प्रयोग यशस्वी राहिला तर हा फॉर्म्युला देशभरात लागू करण्यात येईल. दुसरीकडे राहुल गांधी वेगवेगळ्या समूहांशी चर्चा करत आहेत. खाण मजुरांसह अल्पसंख्याक समुदायातील लोकांना ते भेटले आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी ‘चाय पे चर्चा ’ उपक्रम राबवत आहेत. चहासोबत 300 हून अधिक शहरातील लोकांशी थेट बातचीत. त्याचे दोन टप्पे झाले आहेत.

तिसर्‍या टप्प्यांत शेतकर्‍यांशी चर्चा करतील. आम आदमी पार्टीने नागपूर, मुंबई आणि बंगळुरूमध्ये निधी उभारण्यासाठी डिनर आयोजित केले. निधीची पारदर्शकता दाखवण्यासाठी त्याचा तपशील वेबसाइटवर देण्यात आला आहे. भाजपने महाविद्यालये, विद्यापीठाच्या कॅम्पस अँम्बेसेडर कार्यक्रम तयार केला आहे.