आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media News In Marathi, Lok Sabha Election 2014, Divya Marathi

सोशल वेबसाइटच्या नावानं होऊ दे खर्च.. प्रचारासाठी 500 कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्ष गूगल, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल वेबसाइट्सचा वापर करत आहेत. निवडणूक प्रचाराची पारंपरिक माध्यमे मागे पडत असतानाच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या डिजिटल माध्यमावर जवळपास 500 कोटी खर्च होणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


डिजिटल मीडिया तज्ज्ञांच्या मते, यंदाच्या निवडणुकीत जवळपास 10 कोटी मतदार प्रथमच लोकसभेसाठी मतदान करणार असून हे मतदार विविध सोशल वेबसाइट्सवर सक्रिय आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांसाठी ते प्रमुख लक्ष्य आहे. दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवालांनी केलेल्या ऑनलाइन प्रचारानंतर हे माध्यम अधिक प्रभावी मानण्यात येत आहे. यानुसारच विविध राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची ध्येय-धोरणे आखण्यात येत आहेत.


गेम चेंर्जस ठरणार
डिजिटल मार्केटिंग संस्थांच्या मते, सोशल मीडियाचा योग्य वापर झाल्यास हे माध्यम या निवडणुकीत ‘गेम चेंजर’ ठरू शकते. विविध पक्षांनी केलेल्या सर्वेक्षणांनुसार लोकसभेच्या 543 जागांपैकी 160 जागा सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे प्रचारासाठीच्या एकूण खर्चापैकी 5 ते 10} खर्च यावर केला जात आहे.


यूट्यूब, फेसबुकला महत्त्व
सर्व माध्यमांमध्ये भाषेचा अडथळा नसल्यामुळे यूट्यूब सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. स्थानिकांना त्यांच्या भाषेत ध्वनिचित्रफीत दाखवली जात आहे. यासह महत्त्वाच्या सभा, भाषणे आणि घटना गुगल प्लस हँगआऊटवर टाकल्या जात आहेत.


81.40 कोटी एकूण पात्र मतदार
* 20 कोटी मतदारांकडे इंटरनेट असल्याचा अंदाज
*10 कोटी मतदार विविध सोशल वेबसाइट्सवर सक्रिय
* 543 पैकी 160 जागा सोशल मीडियाच्या प्रभावाखाली