आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media Play Key Role In Loksabha 2014 Election

लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा असेल मोठा प्रभाव!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत 543 मतदार संघांपैकी 160 मतदारसंघांवर सोशल मीडियाचा सगळ्यात जास्त प्रभाव असू शकतो, असा निष्कर्ष आयरिस नॉलेज फाउंडेशन व इंटरनेट आणि मोबाइल असोसियेशन ऑफ इंडियाने काढला आहे. सोशल मीडियाचा 67 लोकसभा मतदार संघात मध्‍यम तर 60 संघात कमी प्रभाव असणार आहे. या पाहाणीसाठी फेसबुक अकाउंटस् असलेल्या लोकसभा मतदारसंघाची निवड करण्‍यात आली होती. मागील लोकसभा निवडणुकीत विजयी आणि पराभूत उमेदवार जर फेसबुकवर असतील तर त्याचाही विचार या पाहाणीत करण्‍यात आला आहे.

खालील राज्यातील लोकसभा मतदारसंघात सोशल मीडियाचा प्रभाव आहे.
महाराष्‍ट्र - 21
गुजरात - 17
उत्तर प्रदेश - 14
कर्नाटक - 12
तामिळनाडू - 12
आंध्र प्रदेश - 11
केरल - 10
मध्‍य प्रदेश - 9
दिल्ली - 7
हरियाणा (5)+ पंजाब(5) + राजस्थान(5) - 15
बिहार(4)+ छत्तीसगड (4)+ जम्मू-कश्मीर(4) + झारखंड(4)+ पश्चिम बंगाल (4) - 20