नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कॅबिनेटमध्ये 19 नवीन मंत्र्यांचा समावेश केला. दोन वर्षांपासून चर्चेत राहिलेल्या स्मृती इराणींकडून मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून त्यांना वस्त्रोद्योग मंत्रालय दिले. बढती मिळालेले प्रकाश जावडेकर आता मनुष्यबळ विकास मंत्रालय पाहतील. यावर सोशल मीडियामध्ये यूजर्सकडून स्मृतींची मोठी थट्टा उडवली जात आहे.
असे केले जात आहेत विनोद
> यूजर्सने अनेक भाजप नेत्यांवर टीका केली. पण, यात स्मृती यांना सर्वाधिक लक्ष्य केले गेले.
> स्मृती यांना 'टेक्सटाइल' खाते दिल्यानंतर यूजर्संनी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस शेयर केले आणि लिहिले आता स्मृती अशा ड्रेस बनवतील.
नेमके काय म्हटले ?
> मनीष : स्मृती यांना दुसरे खाते दिले म्हणजे आता शिक्षण क्षेत्रात सुधारणा होईल.
> जय :शाश्वत सत्य, शिक्षणात मागे पडले तर शिवणकला, पाककला हेच करावे लागते.
> राजेश :स्मृती इराणी यांच्या हकालपट्टीमुळे भारतातील सर्वच विद्यापीठाला सुटी देण्यात आली आहे.
> राम : इराणी आपले शिक्षणच नाही तर मंत्रीपदाचा कार्यकाळही पूर्ण करू शकल्या नाहीत.
> प्रियंका लहरी : स्मृती यांना वस्त्रद्योग मिळाल्याने मला आता आपल्या देशातील लोकांच्या वस्त्रांबाबत चिंता लागली आहे.
> पारस शाह : लोक स्मृती इराणींना टार्गेट करत आहेत. पण, त्या अजूनही मंत्री आहेत.
> सुमित्रा : आता शिक्षण विभागाचे अच्छे दिन येतील, अशी आशा करू या !
पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावर नेमक्या अशा आल्या प्रतिक्रिया...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)