आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media Users Attack Rahul Gandhi On Net Neutrality

#RGforNetNeutrality: ट्विटरवर राहुल आणि केवळ राहुल, उडाली खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 59 दिवसांच्या विजनवासानंतर परत आलेले कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सोशल मीडियावर चर्चेत आहेत. रविवारची किसान रॅली असो, सोमवारची संसदेतील स्पिच असो किंवा आजची नेट न्युट्रॅलिटीवर मांडलेली भूमिका असो. सध्या ट्विटरवर केवळ आणि केवळ राहुल गांधी यांच्यावर चर्चा सुरु आहे. केंद्र सरकार सर्वसामान्य लोकांकडून इंटरनेट हिसकावून घेत कार्पोरेट्ला देत आहे, असे राहुल यांनी सांगितल्यावर सोशल मीडियात यावर फार गरमागरम चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे #RGforNetNeutrality हा ट्रेंड दिसून येत आहे.
खिल्ली उडवण्यासह कौतुकही
राहुल गांधी यांची सोशल मीडियावर खिल्ली उडविण्याच्या घडना घडत असतात. त्यांच्यावरील जोक्स फार फेमस आहेत. परंतु, पहिल्यांदाच काही युजर्सनी राहुल गांधी यांचे कौतुकही केले. या विषयावर राहुल यांना आपले समर्थन दिले. राहुल गांधी असे खासदार आहेत ज्यांनी संसदेत तरी किमान हा विषय मांडला, हे त्यांनी अधोरेखित केले. तर टीका करणारे म्हणत आहेत, की राहुल यांनी नेट न्युट्रॅलिटीवर बोलण्याऐवजी त्याचा अभ्यास करायला हवा होता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, सोशल मीडियावर राहुल गांधी यांची कशी उडवली जात आहे खिल्ली...