आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Social Media Users Mocked Modi Government On 100 Days Completion

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#whereIsblackMoney: मोदी सरकारच्या \'सेंच्युरी\'ची TWITTER वर खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: बहुतांश 'ट्वीट्स'द्वारा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारला सत्तेत येऊन शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या अडीच वर्षात झाले नाही ते 100 दिवसांत करून दाखवल्याचा दावा मोदींनी केला असला तरी सोशल मीडियावर मात्र केंद्र सरकारची खिल्ली उडवण्यात आली आहे. विदेशी बॅंकांमध्ये जमा असलेला 'काळा पैसा (Black Money) आणि मोदी सरकारचे मौन' यावर नेटिजन्सनी तुफान टीका केली आहे.


मोदी सरकारला सत्तेत येऊन 100 दिवस झाले असले तरी त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. यामुळे बहुतेक 'ट्वीट्स'मधून मोदी सरकारविषयी नाराजी व्यक्त होत आहे.

Twitter वर मंगळवारी सायंकाळपर्यंत #100AccheDin, #WhereIsBlackMoney, #100DaysIndiaPays हा ट्रेंड कायम होता. भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीच्या काळात देशातील जनतेला दिलेल्या आश्वासनाची बहुतेक नेटिजन्सनी आठवणही करून दिली आहे.
'केंद्र सरकारची इच्छाशक्ती असेल तर दोन महिन्यांत विदेशातील काळा पैसा देशात परत येऊ शकतो', असे भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटले होते. तसेच विद्यमान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील 17 एप्रिलला म्हटले होते की, 'जर केंद्रात आमचे सरकार स्थापन होईल तर 100 दिवसांत विदेशातील भारतीयांचा काळा पैसा देशात परत आणला जाईल.

परिणामी केंद्रात भाजपची सत्ता आहे. राजनाथ सिंह हे देशाचे गृहमंत्री आहे आणि भाजपची सत्ता येऊन 100 दिवस पूर्ण झाले आहे. परंतु अजूनही विदेशातील काळा पैसा देशात परत आणण्यासाठी मोदी सरकारने ठोस पाऊले उचलेली दिसत नाही. यावर #WhereIsBlackMoney असा सवाल Twitter वर उपस्थित करण्‍यात आला आहे.

कॉंग्रेसने केले धरणे आंदोलन...
नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयुआय) कार्यकर्त्यांनी मंगळवारी राजनाथ सिंह यांच्या घराबाहेर धरणे आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे एम. जॉन म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपान दौर्‍यावर आहेत. परंतु नरेंद्र मोदी यांनी जपानला न जाता स्वित्झर्लंडचा दौरा करायला हवा होता. स्वित्झर्लंडमधील बॅंकांनामध्ये जमा असलेला काळा पैसा शोधून काढायला हवा होता.
एनएसयूआयच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षारक्षकांनी राजनाथ सिंह यांच्या घराबाहेर बॅरिकेड लावले आहे. एनएसयूआयच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीसह कोलकाता, मुंबई, अहमदाबाद आणि बंगळुरुमध्ये एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

पुढील स्‍लाइड्सवर क्लिक करून पाहा, सोशल मीडियावरील शेअर झालेल्या मोदी सरकारची खिल्ली उडवणार्‍या पोस्ट...