आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Sites User Comes In Support Of Shahrukh Khan

शिवसेना म्‍हणाली- शाहरुख खान मुस्‍लिम आहे म्‍हणुन त्‍याला लक्ष्‍य करणे चुकीचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी अभिनेता शाहरुख खानला देशद्रोही म्हटल्यानंतर सोशल मीडिया युजर्स शाहरुखच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. बुधवारी #KailashVijayvargiyaLeaveIndia ट्रेन्ड करत आहे. ट्विटरवर शाहरुखच्या समर्थकांनी विजयवर्गीय यांच्यावर जोरादार टिका सुरु केली आहे. काहींनी तर त्यांना देश सोडून जाण्याचा सल्ला दिला. या मुद्यावर भारतात अवघ्या एका तासात 8 हजार लोकांनी ट्विट केले. दुसरीकडे, माजी मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी त्यांचे वक्तव्य बुधवारी सकाळी मागे घेतले. मात्र त्यानंतर भाजपच्या इतर नेत्यांनी शाहरुखवर शाब्दिक हल्ला सुरु केला आहे. खासदार आदित्यनाथ यांनी शाहरुखची तुलना हाफिज सईद सोबत केली.
शिवसेनने केला शाहरुखचा बचाव?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी प्रतिक्रीया दिली की, हा देश सहनशील आहे. मुस्लिमही सहनशील आहेत. शाहरुख खान मुस्‍लीम आहे, म्‍हणुन त्‍याला टार्गेट केले जाऊ नये. शाहरुख सुपरस्टार आहे, कारण त्‍याने कधी धर्माचा वापर केला नाही. शाहरुखला या वादात ओढायला नको.
शाहरुखच्या समर्थनार्थ करण्यात आलेले काही निवडक ट्विट्स..@iamather
Make @iamsrk sir happy...ND b continue as trending ....jab tak wala maafi na mange...#IStayWithSRk
#KailashVijayvargiyaLeaveIndia
@DrKumarVishwas
Hey #KailashVijayvargiyaLeaveIndi U hv a co-passenger @arunjaitley 's new tolerance-tutors
@Khan07naved
SRK NE INDIA KA HAR WAQT NAAM roshan kya hai...ye kailash dooba raha h bhejo Pakistan isko.
#KailashVijayvargiyaLeaveIndia
@mohammedammaar1
#KailashVijayvargiyaLeaveIndia Mr Modi ,U only made fake promises! The situation in India is horrible & u keeping quiet is another sad thing.
@omnimutant
Kailash gone and now Yogi Adityanath in hot seat to carry forward the hate job. #KailashVijayvargiyaLeaveIndia
@gibssy174
Bjp mp kailash is a fool... he must be sent to some african jungle... dont dare to speak against srk. #KailashVijayvargiyaLeaveIndia
@baskodigama
Haa Haa.SRK.Chalo bulawa aaya hai,hafiz ne bulaya hai..REQUEST..Apne brainless fans ko bhi le jana.. #KailashVijayvargiyaLeaveIndia.

आतापर्यंत कोण काय म्हणाले
> मध्यप्रदेशचे माजी मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी मंगळवारी सायंकाळी ट्विट करुन शाहरुखवर निशणा साधला होता. ते म्हणाले होते, 'शाहरुख राहातो भारतात, पण त्याचे मन नेहमी पाकिस्तानात असते.त्याचे चित्रपट येथे कोट्यवधी कमावतात आणि त्याला भारत असहिष्णु वाटतो. हा देशद्रोह नाही तर काय आहे ? भारतात असहिष्णु वातावरण तयार करणे हे एक षडयंत्र आहे. शाहरुखचा असहिष्णु राग पाक आणि भारत विरोधी शक्तींच्या सुरातसूर मिसळणारा आहे. जेव्हा 1993 मध्ये मुंबईत शेकडो लोक मारले गेले तेव्हा शाहरुख कुठे होता ? जेव्हा मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला होता, तेव्हा शाहरुख कुठे होता ?'

> कैलाश विजयवर्गीय यांनी बुधवारी त्यांचे विधान मागे घेतले आहे. मात्र त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे दुसरे नेते गोरखपूरचे खासदार आदित्यनाथ यांनी या मुद्यावर भडक वक्तव्य केले. ते म्हणाले, शाहरुख आणि दहशतवादी हाफिज सईद यांच्या भाषेत काही फरक नाही. ते म्हणाले, 'जर या देशातील बहुसंख्य समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला तर त्यांना सामान्य मुसलमाना प्रमाणे फिरायची वेळ येईल. मुद्यांवर तथ्यांसह चर्चा झाली पाहिजे. जगातील सर्वात सहिष्णु हिंदू समाजाला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. याचा सामूहिक निषेध केला गेला पाहिजे.' (सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

> विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनीही या सहिष्णु- असहिष्णुता वादात उडी घेतली. त्यांनी शाहरुख खानला पाकिस्तानचा एजंट म्हटले. साध्वी प्राची म्हणाल्या, 'शाहरुख पाकिस्तानी एजंट आहे. त्याने पाकिस्तानातच गेले पाहिजे. पुरस्कार परत करण्याचे समर्थन करुन त्याने राष्ट्रद्रोह केला आहे. त्याला त्याची शिक्षा मिळाली पाहिजे.फक्त शाहरुख खानच नाही तर पुरस्कार परत करणाऱ्या सर्वांवर राष्ट्रद्रोहाचा खटला भरला पाहिजे.'
> बुधवारी राचीमध्‍ये रामदेवबाबा यांनीही शाहरुखवर निशाणा साधला. ते म्‍हणाले,‘शाहरूख जर खरा देशभक्‍त असेल तर, त्‍याने पद्मश्री पुरस्‍कार मिळाल्‍यानंतरची सर्व संपत्‍ती दान करायला हवी होती किंवा पंतप्रधान सहायता निधीमध्‍ये मदत द्यायला हवी होती. नाहीतर आम्‍ही असे समजू की, ज्‍याची चाकरी करून त्‍याने सन्‍मान मिळवला, त्‍यांना खुश करण्‍यासाठी शाहरूख असे बोलत आहे.
काय म्हणाला होता शाहरुख
शाहरुख खानने नुकताच आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. देशात निर्माण झालेल्या धार्मिक वातावरणावर शाहरुखने चिंता व्यक्त केली होती. इतकेच नव्हे तर त्याने देशातील असहिष्णुतेबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. देशातील असहिष्णुता वाढत आहे. लोक कुठलाही विचार न करता आपले मत प्रगट करत असल्याचे शाहरुखने म्हटले आहे.
गरज पडल्यास आपणही आपला पुरस्कार परत करणार असल्याचे शाहरुखने वाढदिवसानिमित्त आयोजित ट्विटर टाऊनहॉलमध्ये चाहत्यांच्या एका प्रश्नांला उत्तर देताना म्हटले होते. देशातील असहिष्णुता अधिकच वाढल्यास आपणही आपले पुरस्कार परत करू असा इशारा शाहरुख दिला होता.

> आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांनी या सर्व गोष्टींना पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

> दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, शाहरुख आम्हाला तुझा अभिमान आहे.

> शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शाहरुखचे समर्थन केले नाही मात्र, केवळ मुस्लीम आहे म्हणून शाहरूखवर टीका करता कामा नये, असे म्हटले आहे आहे. ते म्हणाले, 'विचार व्यक्त करण्याचा जेवढा अधिकार इतरांना आहे, तितकाच त्यालाही आहे.'

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सोशल मीडियावरील कमेंट्स