(फोटो- उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने मारलेल्या मुसंडीवर हे कार्टुन तयार करण्यात आले आहे.)
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीत चमत्कारी प्रदर्शन करणाऱ्या भाजपला आज झालेल्या पोटनिवडणुकांनी मोठा झटका बसला आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे संख्याबळ समाजवादी पक्षाच्या तुलनेत बरेच खाली गेले आहे. राजस्थानमध्येही भाजपचे प्रदर्शन खराब राहिले आहे.
कॉंग्रेसने राजस्थानमध्ये चारपैकी तीन जागा जिंकल्या तर भाजपला केवळ एक जागा राखता आली. गुजरातमध्येही भाजपला कॉंग्रेसने कडवी झुंज दिली. येथील एकूण 9 पैकी दोन जागा कॉंग्रेसने जिंकल्या. परंतु, पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिल्यांदाच खाते खुले झाले आहे. येथील बसीरहाट मतदारसंघात भाजपला यश मिळाले आहे.
ठिकठिकाणी भाजपला मिळालेल्या अपयशावर विरोधी पक्षांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. सोबत सोशल मीडियावरही भाजपची आणि मोदी सरकारची खिल्ली उडवली जात आहे. त्यामुळे #ModiFailsTest हा टॅग टॉप ट्रेंडमध्ये आला.
पुढील स्लाईडवर बघा, सोशल मीडियाने कशी उडवली खिल्ली...