आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहराबुद्दीन प्रकरण : अमित शहांवर पुन्हा खटला नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात पुन्हा खटला चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने शहा यांना आरोपमुक्त करण्याविरुद्ध दाखल याचिका फेटाळली. याचिका सामाजिक कार्यकर्ते व निवृत्त नोकरशहा हर्ष मंदर यांनी दाखल केली होती.

न्या. एस.ए. बोबडे आणि अशोक भूषण यांच्या पीठाने मंदर यांच्या याचिकेवर प्रश्न उपस्थित केला. न्यायालयाने म्हटले की, एखाद्या व्यक्तीस खरोखरच त्रास असेल तर ती बाब वेगळी. मात्र, ज्या प्रकरणाशी कोण्या व्यक्तीचा दुरान्वेयही संबंध नाही आणि तो प्रकरण उघडण्यास सांगत असेल तर खटला वेगळा ठरतो. मंदर यांचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही,असे लोकांना वाटले पाहिजे. अमित शहा यांचे वकील हरीश साळवे यांनी न्यायालयाच्या जुन्या निकालांचा हवाला देत म्हटले की, खटल्याशी संबंध नसणारा व्यक्ती त्यात लक्ष घालू शकत नाही. साधारण अर्ध्या तासाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने याचिका फेटाळली. मंदर यांनी शहा यांना आरोपमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालास आव्हान दिले होते.
बातम्या आणखी आहेत...