आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतात मातीची तपासणी, अहवालही त्वरित देणार; सरकार उपलब्ध करवून देणार उपकरणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शेतातच मातीची तपासणी करण्यासाठी सरकार हँडहेल्ड उपकरण उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवरच त्याचा अहवाल मिळू शकेल. हे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी कृषी मंत्रालय खासगी संस्थांची मदत घेणार आहे. खासगी क्षेत्रांतील संस्था शेतकऱ्यांशी संपर्क साधतील. त्यांच्या शेतजमिनीतील मातीची चाचणी केली जाईल. या संस्थांकडे जर शेतकरी आले नाहीत तर स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्यांना संस्थांशी जोडले जाईल.
 
कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती रविवारी दिली. प्रत्येक गटामध्ये मातीची चाचणी झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. यासाठी प्रत्येक गटात प्रयोगशाळा उभारायची ठरवल्यास ४० लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल. त्यांचा विकास होण्यास अवधी लागेल. या अडथळ्यावर मात करण्यासाठी कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी छोट्या उपकरणाचा पर्याय दिला आहे. ही मशीन हाताने चालवता येते. एक मशीन लाख रुपयांची आहे. सिंह यांचे म्हणणे आहे की, या कामासाठी गटस्तरावर खासगी प्रयोगशाळा उभारणीला केंद्र प्रोत्साहन देत आहे. रक्तदाब, रक्त तपासणीसाठी जशा लॅब ठिकठिकाणी आहेत तसेच त्यांचे सार्वत्रीकरण होण्याची गरज सिंह यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.
 
कंत्राटी शेतीसाठी मॉडेल कायदा आणणार : कंत्राटीशेती (काँट्रॅक्ट फार्मिंग) साठी येत्या महिन्यांत मॉडेल कायदा आणला जाईल. सध्या याच्या मसुद्याला अंतिम रूप देणे सुरू आहे. पूर्वी असलेल्या कायद्यात काही दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आहेत. याअंतर्गत जमीनमालकाला अधिकार असेल. तो वाटेल तेव्हा शेतजमीन रिकामी करवून घेऊ शकेल. जे शेतकरी कसण्यासाठी जमीन कंत्राटी तत्त्वावर घेतील त्यांना शेतीसाठी आणि उत्पादनावर कर्ज घेण्याचा अधिकार असेल. जमिनीची मालकी मालकाकडे असेल.
बातम्या आणखी आहेत...