आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारगीलमध्ये भूकंपानंतर झालेल्या हिमस्खलनात आर्मी पोस्ट उद्धवस्त, जवान बेपत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू/नवी दिल्ली- कारगीलमध्ये भूकंपानंतर झालेल्या हिमस्खलनामुळे लष्कराची एक चौकी उद्धवस्त झाली असून एक जवान बेपत्ता आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले असून जवानाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान गेल्या फेब्रुवारी महिन्यात आलेल्या भूस्खलनात 10 जवान शहीद झाले होते.

चौकीवर होते दोन जवान तैनात...
- लष्कराची 17500 फूट उंचीवर होती. हिमस्खलन झाले तेव्हा चौकीवर दोन जवान तैनात होते. त्यापैकी एक जवान बेपत्ता आहे.
- 17 मार्च रोजी रात्री 10 वाजून 45 मिनिटांना भूकंपाचा धक्के जाणावले त्यानंतर हिमकडा कोसळला.
- तीन फेब्रुवारीला सियाचिनमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे भारतीय लष्कराचे 10जवान शहीद झाले होते.
- 10 पैकी एका जवानाला (हनुमंथप्पा) 35 फूट बर्फातून 125 तासांनंतर बाहेर काढण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान या जवानाचाही मृत्यू झाला होता.
बातम्या आणखी आहेत...