आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती तेजबहादूर सुखरूप, मी समाधानी: शर्मिलादेवी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मी माझ्या पतीची भेट घेतली असून तो सुखरूप असल्याबद्दल समाधानी आहे, असे बीएसएफचा जवान तेजबहादूर याची पत्नी शर्मिलादेवी हिने बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले. जवानांना देण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) जवान तेजबहादूर याने सोशल मीडियावर तक्रार केली होती, तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत आहे.
  
अन्नाच्या गुणवत्तेबद्दल तक्रार केल्यामुळे आपला पती सुरक्षित नाही, तो बेपत्ता आहे. मी त्याच्याशी संपर्क साधू इच्छित नाही. त्याच्या जिवाला धोका आहे, त्यामुळे त्याला शोधण्यात यावे, अशी तक्रार करणारी बंदी प्रत्यक्षीकरण याचिका (हेबिअस कॉर्पस) शर्मिलादेवी हिने उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर तेजबहादूरची सध्या जेथे नियुक्ती करण्यात आली आहे तेथे शर्मिला देवी यांना दोन दिवस त्याची भेट घेऊ द्यावी, असे निर्देश न्यायमूर्ती जी. एस. सिस्तानी आणि न्यायमूर्ती विनोद गोयल यांनी सरकारला दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार, शर्मिलादेवी यांनी पती तेजबहादूरची भेट घेतली.

आता आपली तक्रार राहिली नाही, असे शर्मिला यांनी न्यायालयाला कळवले.  केंद्र आणि बीएसएफतर्फे बाजू मांडताना अॅड. गौरांग कांत यांनी सांगितले की, ‘तेजबहादूरकडे नवा मोबाइल फोन आहे. कुटुंबीयांशी बोलण्याबद्दल त्याच्यावर कुठलेही निर्बंध नाहीत. त्याला अवैधपणे ताब्यात घेतलेले नसून त्याला जम्मूच्या सांबामधील कालिबाडी येथील ८८ व्या बटालियनच्या मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.’  न्यायालयाने शर्मिलादेवी यांच्या म्हणण्याची दखल घेऊन याचिका निकाली काढली. 
बातम्या आणखी आहेत...