आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solicitor General Of India Counters CBI Chief Over Lalu Prasad Yadav

लालूप्रसादांवरील प्रकरणे मागे घेण्यास विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात चारा घोटाळ्याप्रकरणी दाखल असलेली तीन प्रकरणे मागे घेण्यास सॉलिसिटर जनरल मोहन पारासरन यांनी नकार दिला आहे. आरोप मागे घेण्याबाबत निर्णय न्यायालयाने घ्यायला हवेत, असे त्यांनी म्हटले आहे.

सीबीआयचे संचालक रंजित सिन्हा यांच्या लालूंवरील प्रकरणे मागे घेण्याच्या मुद्दय़ावर इतर अधिकार्‍यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर तपास संस्थेने सॉलिसिटर जनरलांचे मत मागवले होते. त्यावर असे निर्णय न्यायालयावरच सोडून द्यायला हवेत, असे उत्तर पारासरन यांनी दिले.

सीबीआयचे प्रमुख रंजित सिन्हा यांनी गेल्या आठवड्यात लालू यांच्यावरील तीन प्रकरणे मागे घेण्याच्या बाजूने वक्तव्य केले होते. ज्या एका प्रकरणात लालू यांना आरोपी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे त्याच प्रकारचे हे तीन आरोप असल्याचे मत त्यांनी मांडले होते. मात्र, संचालक ओ. पी. वर्मा आणि पाटणा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे मत मात्र वेगळे होते. त्यामुळे याप्रकरणी सॉलिसिटर जनरलांचे मत मागवण्यात आले होते.

ही प्रकरणे मागे घेण्याची शिफारस
डिसेंबर 1995 पासून जानेवारी 1996 दरम्यान दुमका येथील कोशातून अवैधरीत्या 3.13 कोटी रुपये काढणे
1990 पासून 1994 दरम्यान देवघर कोशातून अवैधरीत्या 84.53 लाख रुपये काढणे
डिसेंबर 1992-93 दरम्यान चायबासा कोशातून अवैधरीत्या 33.13 कोटी रुपये काढणे