आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solider Officer Clash Case : 168 Gets Panishment

लडाखमध्ये जवान-अधिका-यांमधील मारहाणप्रकरणी 168 जणांवर होणार कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लष्करातील एक कर्नल, दोन मेजर आणि एका कॅप्टनसह 168 जवानांवर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. कोर्ट ऑफ इन्क्वायरीच्या अहवालात संबंधितांना जाळपोळ व हल्ला प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.

गेल्यावर्षी 10 मे रोजी लडाखच्या न्योमा सेक्टरमध्ये जवान आणि अधिका-यांतील चकमक प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ब्रिगेडियर अजय तलवार यांच्या अध्यक्षतेखालील कोर्ट ऑफ इन्क्वायरी (सीओआय) स्थापन करण्यात आली होती. सीओआयच्या दोन हजार पानी अहवाल गेल्यावर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात आला होता. सीओआयने चौकशीदरम्यान 215 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यानुसार सारांश अहवाल तयार केला जाईल. यामध्ये सर्व दोषींविरोधात कोर्ट मार्शलची शिफारस केली जाऊ शकते. या प्रकरणात तीन महिने ते 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असून वेतन व भत्तेही कापले जाऊ शकतात.

अफवा पसरताच जवान संतप्त
मे 2012 मध्ये लडाखच्या माहे फायरिंग रेंजमध्ये 226 फिल्ड रेजिमेंटचे लष्करी अधिकारी सराव करत होते. यादरम्यान अचानक एका जवानाने अधिका-याला मारहाणीस सुरुवात केली. त्यांनी बेशुद्धावस्थेतील जवानाला रुग्णालयात नेण्यासही विरोध केला होता. या जवानाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली. यामुळे जवान संतप्त झाले. आक्रमक जवानांनी युनिट कमांडिंग अधिका-यासह अनेक अधिका-यांना ओलिस ठेवले. यातून मार्ग काढण्यासाठी नजीकच्या युनिटमधील जवानांना तेथे पाठवणे भाग पडले. या प्रकरणाची चौकशी करून अधिका-यांविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ओलिस अधिका-यांना सोडण्यात आले.

... आणि यामुळे भडकले अधिकारी
एक जवान अनवधानाने एका छावणीत गेला होता. तेथे एका अधिका-याची पत्नी स्नान करत होती. ते पाहताच जवान आला तसा माघारी फिरला. महिलेने या प्रकरणाला फार महत्त्व दिले नाही. दुपारच्या जेवणावेळी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अधिका-यांनी जवानाला बोलावले व बेदम मारहाण केली.

शिस्तभंगाची प्रकरणे वाढली
लष्करामध्ये गेल्या काही दिवसांत शिस्तभंगाची प्रकरणे वाढली आहेत. गेल्यावर्षी न्योमाव्यतिरिक्त गुरुदासपूरच्या 45 आर्मर्ड रेजिमेंट आणि सांबाच्या 16 कॅव्हेलरीमध्ये मारहाणीच्या घटना घडल्या होत्या. सांबाच्या घटनेत 60 जवानांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यात आली होती.