आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solution On Inflation : Government Wheat, Rice Buying

महागाईवर उपाययोजना: सरकार गहू, तांदूळ विकणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने दीड कोटी टन धान्य खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत सरकार 1500 रुपये क्विंटल दराने एक कोटी टन गहू तर 1875 रुपये क्विंटल भावाने 5 लाख टन तांदूळ विकणार आहे.


पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील आर्थिक प्रकरणांच्या मंत्रिगटाच्या (सीसीईए) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याची माहिती देताना अन्नमंत्री के. व्ही. थॉमस यांनी सांगितले की, भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांमध्ये गहू व तांदूळ ओपन मार्केट सेलअंतर्गत खुल्या बाजारात विकण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सरकारवर अनुदानरूपाने 5 हजार 491 कोटींचा बोजा पडणार आहे. या बैठकीत सरकारी कंपन्यांच्या माध्यमातून 20 लाख टन गहू निर्यात करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली नाही.


अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले की सरकारकडे धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
खुल्या बाजारात धान्य विक्री केल्याने नवे धान्य ठेवण्यास गोदामे उपलब्ध होतील. या बैठकीत नैसर्गिक वायूच्या किमती वाढवण्यासंदर्भात निर्णय होणे अपेक्षित होते. परंतु पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांच्या अनुपस्थितीमुळे तो होऊ शकला नाही.


महागडी वीज चांगलीच : अर्थमंत्री
आयात केलेल्या कोळशापासून निर्माण होणा-या विजेच्या निर्मिती खर्चाचा बोजा सरकारने ग्राहकांवर टाकला आहे. याबाबत बोलताना अर्थमंत्री चिदंबरम म्हणाले की, या निर्णयामुळे वीज दरांत फारशी वाढ होणार नाही. तसेही वीज न मिळण्यापेक्षा ती महाग मिळत असेल तर चांगलेच आहे.


वीज किती महाग होईल हे वीज प्रकल्प, वीज व आयात कोळशाची मागणी आदी बाबींवर अवलंबून आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती आयात कोळशापासून होणा-या वीजेच्या किमतीत दर युनिटमागे 15 ते 17 पैशांची वाढ होऊ शकते.