नवी दिल्ली - भारताचा एकेरीतील स्टार खेळाडू सोमदेव देववर्मनने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा टॉप-100 मध्ये प्रवेश केला. त्याने क्रमवारीत 97 वे स्थान गाठले. पोर्तुगाल ओपन टेनिस स्पर्धेच्या सलामी सामन्यात सोमदेवने शानदार विजय मिळवला होता. याशिवाय त्याने तब्बल तीन महिन्यांनंतर सलामी सामन्यात विजय मिळवला होता. या कामगिरीच्या बळावर त्याने क्रमवारीत पाच स्थानांनी प्रगती साधली. गेल्या आठवड्यात त्याची 102 व्या स्थानावर घसरण झाली होती. युकी भांबरीची 155 व्या स्थानावर घसरण झाली. त्याचे क्रमवारीत दोन स्थानांनी नुकसान झाले. एकेरीच्या क्रमवारीत
राफेल नदालने अव्वल व नोवाक योकोविकने दुसरे स्थान कायम ठेवले आहे.