आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही मंत्र्यांना बडतर्फ करायला हवे, विद्यार्थी आत्महत्याप्रकरणी काँग्रेसची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हैदराबादेतील दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी आणि बंडारू दत्तात्रय यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसने रविवारी पंतप्रधान मोदी खरेच संवेदनशील असतील तर त्यांनी अनेकांना बडतर्फ केले असते, असे म्हटले आहे.

हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी राेहित वेमुलाच्या आत्महत्या प्रकरणात त्या विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव यांना पदावरून हटवावे, अशी मागणी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली. काँग्रेसने इराणी आणि दत्तात्रय यांना तत्काळ पायउतार करण्याची मागणी केली आहे. मागण्या कितीही झाल्या तरी पंतप्रधान कोणाविरुद्धही कारवाई करणार नाहीत, असे सिब्बल यांनी सांगितले.

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आरक्षण धोरणाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता सिब्बल म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दलितांच्या बाजूने नाही, ही मूळ समस्या आहे. दलितहित त्यांच्या डीएनएत नाही.

शहांच्या नेतृत्वाखाली पराभवाची मालिका : अमितशहा यांच्या भाजप अध्यक्षपदाच्या फेरनिवडीबाबत सिब्बल म्हणाले, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला पराभवामागून पराभवाचा सामना करावा लागेल. ते बिहारमधून हरले आणि आता पंजाब, उत्तर प्रदेश आणि आसामसारख्या राज्यांतूनही पराभव होईल.

हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाचे वादग्रस्त कुलगुरू अप्पा राव रविवारी रजेवर गेले. वरिष्ठ प्रोफेसर विपिन श्रीवास्तव राव यांच्या रजेच्या काळात पदभार स्वीकारतील, असे प्रशासनाने जाहीर केले. निलंबनाचे प्रकरणावरून टीका झाली.