आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी हिटलर बनण्याचे स्वप्न पाहतो आहे; शरद पवारांचे मोदींवर शरसंधान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी ‍दिल्ली- राष्‍ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पुन्हा एकदा भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर शरसंधान साधले आहे. 'कोणी हिटलर बनण्याचे स्वप्न पाहतो आहे, मात्र आम्ही त्याला निवडणुकीत यशस्वी होवू देणार नाही', असे शरद पवार यांनी ट्‍विट केले आहे.

महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याबाबत आघाडी सरकार प्रयत्नशील असताना भाजपचा त्याला विरोध आहे. असा पक्ष सत्तेत आल्यानंतर महिलांचा काय सन्मान करणार, असेही पवारांनी म्हटले आहे.

दरम्यान, पूर्वीही पवारांनी मोदींवर हल्लाबोल केला होता. मोदींची मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करायला हवे, असे पवारांनी म्हटले होते.