आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Other Modis Who Done A Great Job In Their Field

हे मोदीही झाले प्रसिद्ध, पण \'नरेंद्र\' सारखे वैभव नाही मिळवता आले या 10 मोदींना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - गुगल सर्चमध्ये केवळ मोदी असे टाइप केले तरी भारताचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधीत लाखो लिंक्स आणि फोटो आपल्यासमोर येतात. नरेंद्र मोदी आज एवढे प्रसिद्ध झाले आहेत की, मोदी शब्द कानावर पडताच सर्वात आधी डोळ्यासमोर त्यांचे चित्र उभे राहते. तसे पाहता मोदी आडनाव असणा-या अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी क्रीडा, उद्योग, चित्रपट अशा विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. पण नरेंद्र मोदींएवढे वैभव कदाचित त्यांच्या भाग्यात नसणार. अशाच काही व्यक्तींच्या कारकीर्दीवर एक नजर टाकुयात.
ललित मोदी

ललित मोदी यांनाच आयपीएलचे जन्मदाते म्हटले जाते. या क्रिकेट स्पर्धेने जगभरात क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले. पहिल्या तीन पर्वानंतर ललित मोदींना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आयपीएलपासून दूर करण्यात आले. सध्या इंग्लंडमध्ये राहणारे मोदी मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळतात. त्यांनी बीसीसीआयचे उपाध्यक्षपदही भूषवले आहे. ते एक प्रसिद्ध उद्योजकही असून मोदी इंटरप्राइजेसचे एमडी आहेत. तसेच गॉडफ्रे फिलिप्‍स इंडियाचे एकक्झिक्युटीव्ह डायरेक्टरही आहेत. ललित मोदी यांची नुकतीच राजस्‍थान क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
पुढे वाचा - मोदी आडनावाच्या आणखी काही दिग्गजांबाबत