आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Unknown And Interesting Facts About Jawaharlal Nehru

PM नेहरुंकडे टॅक्सीवाल्याला द्यायला नव्हते पैसे, वाचा Interesting Facts

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंची आज 126 वी जयंती आहे. या निमीत्ताने divyamarathi.com घेऊन आले आहे त्यांच्या आयुष्यासंबंधीच्या रोचक घटना, ज्या कदाचित आजपर्यंत तुम्हाला माहित नसतील.
टॅक्सीवाल्याला देण्यासाठी नव्हते पैसे
पंडितजींच्या ऑफिसमध्ये काम करणारे जनक राज जय यांनी 'स्ट्रोक्स ऑन लॉ अँड डेमोक्रेसी इन इंडिया' पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की एकदा जवाहरलाल नेहरु आपल्या बंगल्यातून ऑफिसला जाण्यासाठी निघाले होते. रस्त्यात साऊथ अव्हेन्यू येथे त्यांची कार पंक्चर झाली. तिथून जात असलेल्या टॅक्सी ड्रायव्हरने नेहरुंना रोडवर उभे पाहिले तेव्हा त्याने त्यांना टॅक्सीत बसवून घेतले आणि ऑफिसपर्यंत सोडले. टॅक्सीतून उतरल्यानंतर जेव्हा नेहरुजी आपले खिसे चाचपू लागले तेव्हा त्यांच्या खिशात पैसे नव्हते. तेव्हा टॅक्सी ड्रायव्हर त्यांच्याकडून पैसे न घेताच निघून गेला.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, 11 वेळा नोबेल पुरस्कारासाठी नॉमिनेट झाले होते नेहरु