आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Loaders Of FCI Earn More Than Rs 4 Lakh Per Month

अबब, एफसीआयच्या हमालांचा पगार महिना 4 लाख रुपये!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय)मध्ये काही कामगार असे आहेत, ज्यांचे मासिक उत्पन्न सहा आकड्यांमध्ये आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्रात आलेल्या वृत्तानुसार ऑगस्ट 2014 मध्ये येथे काम करणार्‍या कामगारांना 4-4 लाख रुपये पगार देण्यात आला. यामध्ये भत्ता,इन्सेंटिव्ह, एरियर आणि ओव्हरटाईमचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्यातच 386 कामगारांना 2 ते 2.50 लाखापर्यंत पगार देण्यात आला.

या वर्तमानपत्राने काही कागदपत्रांच्या आधारावर दावा केला आहे की, एफसीआयमध्ये काही 'कामगार गँग' कार्यरत असून यांनी एक खास सिस्टीम तयार केली आहे. या सिस्टीममुळे यांना सरकारी खजिन्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पगार आणि भत्ता दिला जातो. या वृत्तानुसार, संप करण्याच्या धमक्यांव्यतिरिक्त एफसीआय मॅनेजमेंट आणि कामगार संघटनेमध्ये झालेल्या काही कठोर करारांमुळे कामगारांना मिळणार्‍या भत्त्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त, कामगारांच्या कमतरतेमुळे ही समस्या अधिकच वाढली आहे. काही डेपोंमध्ये जास्त कामगार आहेत परंतु अनेक डेपो असे आहेत ज्यामध्ये कामाचा व्याप जास्त आहे.

कशी आहे कामाची पद्धत
एफसीआयचे सूत्र आणि एक्स्पर्ट सांगतात की, चांगला पगार उचलणारे हमाल स्वतःच्या नावावर कामगारांना ठेवून घेतात. या कामगारांना ते 7-8 हजार रुपये देतात. किती पोते चढवले आणि उतरवले या आकड्यांवर पगार मिळतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोडिंग आणि अनलोडिंगच्या आकड्यांना वाढवून सांगितले जाते, ज्यामुळे पगार जास्त मिळू शकेल. एवढेच नाही तर कधीकधी लोड केलेल्या पोत्यांची संख्या 500 पेक्षा जास्त सांगितली जाते.