नवी दिल्ली- सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना ट्रेड युनियनच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. विरोध करणाऱ्यांमध्ये डाव्यांबरोबरच भाजपशी जोडलेल्या कर्मचारी संघटनादेखील आहेत. आतापर्यंतच्या वेतन आयोगापेक्षा या वेळी सर्वात कमी वेतनवाढीची शिफारस करण्यात आल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.
महागाईचा विचार करता इतक्या कमी वेतनवाढीची शिफारस करणे अयोग्य असून या शिफारशींना विरोध करण्यासाठी २७ नोव्हेंबरला संघटनांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेल्या भारतीय मजदूर संघाचे महासचिव वीरेश उपाध्याय यांनी सांगितले की, प्रत्यक्षात १६ टक्क्यांचीच वाढ होणार आहे.