आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग्य वेळ शोधत बसल्यास सत्यही असत्य ठरते - राहुल गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वटहुकुमाबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार समर्थन केले. सत्य सांगण्यास ‘योग्य वेळ’ शोधण्याची गरज नाही. योग्य वेळ शोधत बसल्यास सत्यही असत्य ठरते, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.


पंतप्रधान मनमोहनसिंग अमेरिके च्या दौ-यावर असताना कलंकित लोकप्रतिनिधींच्या वटहुकुमाबद्दल राहुल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. वाल्मीकी महासंमेलन अधिकार दिवसनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राहुल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गुजरात दौ-यावर असताना मला पत्रकारांनी सांगितले की, वटहुकुमाबद्दल वक्तव्य करण्याची तुमची वेळ चुकली, असे विरोधकांचे म्हणणे आहे; पण सत्य बोलण्यासाठी योग्य वेळेची गरज असते का, असा सवाल करून योग्य वेळ शोधत बसल्यास सत्यही असत्य ठरते, असे राहुल म्हणाले. कलंकित लोकप्रतिनिधींचा बचाव करणारा वटहुकूम म्हणजे निव्वळ मूर्खपणा असून तो फाडून फेकला पाहिजे, असे वक्तव्य राहुल यांनी केले होते.


मायावतींनी दलित चळवळ संपवली
वाल्मीकी महासंमेलनाप्रसंगी बोलताना राहुल यांनी बसपा प्रमुख मायावती यांच्यावरही टीकेची झोड उठवली. मायावती यांनी उत्तर प्रदेशात दलित चळवळ संपवली. नव्या नेतृत्वाला पुढे येऊ दिले नाही. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात दलित नेतृत्व पुढे आणण्याची संधी काँग्रेसने दिली पाहिजे, असे राहुल म्हणाले. दलित समाजाचे उत्थान टप्प्याटप्प्यात झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसच्या साथीने घटना लिहिली. दलितांना आरक्षण मिळेल याचीही तरतूद केली. दुस-या टप्प्यात दिवंगत कांशीराम यांनी आरक्षणाचा उपयोग दलितांची संघटना उभारण्यात केला. तिसरा टप्पा मायावती यांचा आहे. दलित चळवळ पुढे नेण्यासाठी एक-दोन दलित नेते पुरेसे नाहीत. लाखो नेत्यांची गरज आहे; परंतु मायावती यांनी दलित चळवळ आपल्या कब्जात घेतली. नव्या नेतृत्वाला, नेत्यांना पुढे येण्याची संधीच दिली नाही, अशी टीका राहुल यांनी केली.