आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर सोमनाथ भारतींची पोलिसांपुढे शरणागती, द्वारका ठाण्यात पोहोचले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आम आदमी पार्टीचे (आप) नेते सोमनाथ भारती हे सोमवारी रात्री दहाच्या सुमारास पोलिसांना शरण आले. सोमनाथ रात्री उशिरा द्वारका ठाण्यात पोहोचले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पत्नीचा छळ व हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना कुठलाही दिलासा मिळू शकला नाही. उलट न्यायालयाने जबाबदार नागरिकाप्रमाणे शरण या, असा सल्ला देऊन त्यांची पुरती कोंडी केली होती.

सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने भारती यांचे वकील व माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रह्मण्यम यांचे भारती यांचे जामिनाबाबतचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले. सुब्रह्मण्यम यांनी सोमनाथ यांच्या दोन मुलांचा विचार करण्याचे अपील केले. त्याचबरोबर त्यांच्या शरण येण्याची मुदत मंगळवारी सायंकाळपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन नाकारला. याचिकाकर्त्याने प्रथम जबाबदार नागरिकासारखे आत्मसमर्पण करावे व त्यानंतर दिलासा मागण्यासाठी यावे, असा सल्ला दिला. पत्नी लिपिका मित्रा यांनी सोमनाथविरुद्ध छळाचा अर्ज दिला असून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाले आहे.
न्यायालयानुसार याचिककर्त्याला सोमवारी सायंकाळी साडेसहापर्यंत शरण यावे लागेल. त्यानंतरच त्याच्या जामीन अर्जावर एका नव्याने विचार करावा लागेल.