आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आप नेते सोमनाथ भारतींविरोधात महिलेच्या छेडछाड-विनयभंग प्रकरणी 100 पानी आरोपपत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे माजी कायदा मंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांच्याविरोधात परदेशी महिलांची छेडछाड आणि स्त्री मर्यादेचा भंग प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राजधानीतील खिडकी एक्स्टेंशन येथे सोमनाथ भारती आपच्या कार्यकाळात मंत्री असताना त्यांनी अफ्रिकन महिलांच्या घरावर छापा टाकला होता. याविरोधात त्या महिलांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
अफ्रिकन महिलांनी भारतींवर गंभीर आरोप केले होते. पोलिसांनी 100 पानी आरोपपत्रात अनेक साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे नमूद केले आहेत. त्यामुळे भारती यांना हे प्रकरण चांगलेच महागात पडणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या आरोपपत्रात भारतींसह इतर 11 जणांचेही नाव आहे.
काय आहे प्रकरण
दिल्लीतील खिडकी एक्स्टेंशन भागात वेश्या व्यवसाय आणि ड्रग्सचे रॅकेट चालत असल्याची तक्रार सोमनाथ भारती यांना त्यांच्या समर्थकांनी केली होती. गेल्या वर्षी 15-16 जानेवारीच्या रात्री त्यांनी येथे येऊन अफ्रिकन महिलांच्या घरावर धाड टाकली होती. यावेळी त्यांच्यासोबत आपचे कार्यकर्तेही होते. त्यांनी महिलांवर वेश्यावृत्तीचा आरोप केला होता. त्यानंतर भारती आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. भारतींचा आरोप होता, की पोलिसांना सर्वकाही माहित असतानाही ते कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत.