आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Somnath Bharti Has Been Arrested By Police For Assaulting AIIMS\' Security Guards

24 तासांत AAP चे 2 MLA अटकेत, भारतींवर AIIMS च्या गार्डला मारहाण केल्याचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमनाथ भारती यांना सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपात अटक झाली. - Divya Marathi
सोमनाथ भारती यांना सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपात अटक झाली.
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे (आप) आमदार सोमनाथ भारती यांना एम्स हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे (एम्स) प्रमुख सुरक्षा अधिकारी आर.एस रावत यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला होता. भारतींनी हे आरोप फेटाळले आहेत. गेल्या 24 तासांत आपच्या आमदारांना अटक होण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी अमानतुल्ला खान यांना अटक झाली होती.
आम आदमी पार्टी आमदारांना कधी-कधी झाली अटक
1.जितेंद्रसिंह तोमर : बनावट डिग्री केसमध्ये जून 2015 मध्ये अटक.
2.मनोज कुमार : 420च्या केसमध्ये जुलै 2015 मध्ये झाली अटक.
3.सुरिंदरसिंह : मारहाणीच्या केसमध्ये ऑगस्ट 2015 मध्ये अटक.
4.सोमनाथ भारती : कौटुंबिक हिंसा प्रकरणात पत्नीच्या तक्रारीवरुन सप्टेंबर 2015 मध्ये अटक. 22 सप्टेंबर रोजी एम्सच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपात अटक.
5.अखिलेश त्रिपाठी :2013 मध्ये दंगल घडवून आणल्याच्या प्रकरणात नोव्हेंबर 2015 मध्ये अटक.
6.महेंद्र यादव :दंगल करण्याच्या आरोपात जानेवारी 2016 मध्ये अटक.
7.जगदीप सिंह :मारहाण केल्याच्या आरोपात मे 2016 मध्ये अटक.
8.दिनेश मोहनिया : ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याच्या आरोपात जून 2016 मध्ये अटक. पत्रकार परिषद सुरु असतानी पोलिसांनी उचलून नेले होते.
9.अमानतुल्ला खान : महिलेला धमकावल्याच्या आरोपात जुलै 2016 मध्ये अटक झाली होती.
10.नरेश यादव: पंजाब मध्ये धार्मिक ग्रंथाचा अवमान केल्या प्रकरणी अटक झाली होती.
11. संदीप कुमार : कथित सेक्स सीडी स्कँडल प्रकरणात 3 सप्टेंबर रोजी अटक झाली होती.
बातम्या आणखी आहेत...