आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Somnath Bharti, Surrender, Jail, Becoming, Arvind Kejriwal, Lipika Mitra

सोमनाथ भारती \'गायब\'; केजरीवाल म्हणाले, हे कृत्य \'आप\'साठी लाजिरवाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावर त्यांची पत्नी लिपिका यांनी कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. त्याचप्रमाणे हायकोर्टाने भारती यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला असून त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावले आहे. तेव्हापासून भारती गायब झाले आहेत. भारती यांचे हे कृत्य पक्ष आणि त्यांच्या कुटुंबासाठी लाजिरवाणे ठरत असल्याचे मुख्यमंत्र‍ी अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

अरविंद केजरीवाल यांनीबुधवारी सकाळी 'ट्वीट' करून सोमनाथ भारती यांना आवाहन केली की, त्यांनी पोलिसांसमोर समर्पण करावे. लांब पळण्यात काहीच अर्थ नाही. भारती यांनी पक्षाला लाजिरवाणे केले आहे.

दुसरीकडे, सोमनाथ भारती यांची पत्नी लिपिका मित्रा हिने त्यांच्यावर दुसरा आरोप केला आहे. तो म्हणजे तक्रार मागे घेण्यासाठी भारती हे पत्नीवर दबाब टाकत आहेत. पत्नीला सुमारे 500 एसएमएस पाठवून तिच्यावर दबावतंत्राचा वापर करत आहे, असे लिपिका मित्रा हिने म्हटले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ट्‍वीट...