आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Son Nitesh Arrested In BSP Leader Deepak Bhardwaj Murder Case

बसपा नेते दीपक भारद्वाज हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा नितेशला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीतील बसपा नेते दीपक भारद्वाज यांच्या हत्येमागे त्यांच्याच मुलाचा हात असल्याचे काही धागोदोरे मिळत असल्याने त्याला अटक केली आहे. नितेश भारद्वाज असे अटक केलेल्या त्यांच्या मुलाचे नाव असून, त्याच्यासोबत त्यांचा वकील बलजीत यालीही अटक करण्यात आली.

संपत्ती व जमिनीच्या वादातून नितिशने आपल्याच वडिलांची हत्या घडवून आणल्याचे धागोदोरे दिल्ली पोलिसांना मिळाले आहेत. तसेच यासाठी ६ कोटी रुपयांची सुपारी दिली गेल्याचे बोलले जातेय. नितेशला या प्रकरणात मित्र निरज आणि बलजीत या वकिलाने मदत केल्याचे पुढे आल्याने या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. नितेश आजच परदेशात जाण्याच्या बेतात होता. मात्र पोलिसांनी त्याला त्यापूर्वीच अटक केली.
दरम्यान, ज्या दोन शूटर्सना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत हरिद्वारमधील एक स्वामी प्रतिमानंद याने सुपारी दिल्याचे पुढे आले होते. हा स्वामी मूळचा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रहिवाशी होता. त्याने 20 वर्षापूर्वी घर सोडले होते. त्यानंतर तो स्वामी बनून हरिद्वारमध्ये राहत होता. तसेच स्वामी आणि दीपक यांच्यातही वाद झाला होता. हरिद्वारमध्ये बांधलेल्या एका व्यावसायिक कॉम्प्लेक्सवरुन या दोघांत पैशाच्या देवाण-घेवाणवरुन वाद होता. मात्र आता दीपक यांच्या मुलाचे नाव पुढे आल्याने मुलानेच स्वामीद्वारे हत्या घडवून आणली काय? असे प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

होळीच्या दिवशी (२७ मार्च) दीपक भारद्वाज यांची त्यांच्या दिल्लीतील फार्म हाऊसवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालेल्या दोन शूटर्सना अटक करण्यात आली होती.