आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या मुलाच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत संसार थाटायचा होता दीपक भारद्वाजांना!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाला हादरवून टाकणा-या दिल्लीतील बसपा नेते व अब्जाधीशाच्या हत्येचे गूढ उकलले आहे. बसपाचे नेते दीपक भारद्वाज यांच्या हत्येमागे त्यांच्या धाकट्या मुलाचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून, या बाप-लेकाची एकच गर्लफ्रेंड (जिचे वय 27 आहे) असल्याचे आता पुढे आले आहे.
दीपक भारद्वाज (वय 62) यांच्यापेक्षा 35 वर्षांनी लहान असलेल्या मुलीसमवेत ते लग्न करु इच्छित होते. तसेच त्यासाठी ते आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन संबंधित मुलीला संपत्तीतील वाटा देणार होते. मात्र ही बाब जेव्हा मुलगा नितेशला कळाली तेव्हा त्याने आपल्या वडिलांचा काटा काढण्याचे ठरवले. गेल्या चार महिन्यापासून नितेश वडील दीपक यांची हत्या घडवून आणण्यास प्रयत्नशील होता. संबंधित मुलीबरोबर आधी नितेशचे अफेयर होते. मात्र त्यानंतर दीपक यांनीच तिला फूस लावली व लग्नाचे व संपत्तीचे आमिष दाखविले होते.
दीपक यांच्या मर्डर मिस्ट्रीमागे रंजक कहानी असल्याचे पुढे येत आहे. भारद्वाज यांच्या हत्येला त्यांची गर्लफ्रेंडच कारणीभूत ठरली असल्याचे पुढे आले आहे. दीपक भारद्वाज आणि मुलगा नितेश या बापलेकाची एकच गर्लफ्रेंड होती. मूळची नितेशची गर्लफ्रेंड असलेल्या या मुलीसोबत दीपक लग्न करु इच्छित होते. त्यासाठी दीपक आपल्या पत्नीला घयस्फोट देऊन संबंधित मुलीसोबत विवाह करणार होते. तसेच घटस्फोट झाल्यानंतर त्या मुलीला आपल्या संपत्तीतील काही वाटा देणार होते. दरम्यान, याची माहिती नितेशला मिळताच तो वडिलांवर चिडला व त्यातूनच दीपक यांच्या हत्येची सुपारी देण्याचा निर्णय नितेश याने घेतला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर कैलाशमध्ये राहणारी बापलेकाची गर्लफ्रेंड भारद्वाज यांच्या कार्यालयातच नोकरीलासुद्धा आहे.
संपत्तीच्या मार्गात वडील अडथळा ठरत असल्याचे लक्षात येताच व संबंधित मुलीमुळे आपल्या आईलाही ते घटस्फोट देत असल्याने नितेश प्रचंड खवळला. त्यामुळे चार महिन्यापूर्वी दीपक यांच्या हत्येसाठी त्याने पाच कोटी रुपयांची सुपारी दिली. यासाठी त्याने आपल्याच फर्ममध्ये वकिलाचे काम करणा-या बलजित सिंग शेरावत (51) ला साथीला घेतले. त्यासाठी त्याने त्याला 50 लाख रूपये दिले. या हत्याकांडातील सुपारीचा मोरक्या असलेल्या बलजीतने आपल्या ओळखीचा स्वामी प्रतिभानंद याला दोन कोटी रुपयांची सुपारी दिली. प्रतिभानंदने त्यासाठी शूटर्स पुरुषोत्तम राणा आणि सुनील मनला दोन लाख रुपये दिले व बाकीचे काम झाल्यानंतर देऊ सांगितले. आता मात्र प्रतिभानंद बेपत्ता असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
दोन दिवस अगोदर दिल्ली सोडली- प्रतिभानंद दिल्लीत योगा टिचर म्हणून दाखल झाले होते, परंतु भारद्वाज यांच्या हत्येच्या दोन दिवस अगोदरच त्यांनी दिल्लीतून पळ काढला. 25 ते 30 मार्च या काळात ते हरिद्वारमध्ये होते. 30 रोजी त्यांनी इंदुरमधील मित्र अवनीश शास्त्री यांची भेट घेतली होती. पोलिसांनी शास्त्री यांची चौकशी केली, परंतु हत्याकांडात त्यांची काही भूमिका नव्हती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रतिभानंदच्या बँकेतील खात्यांची तपासणी पोलिसांनी केली आहे. त्यात फार पैसा दिसून आला नाही, परंतु सहा महिन्यांपूर्वी त्यांनी पासपोर्ट पडताळणीसाठी अर्ज केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
प्रतिभानंदना हवा होता आश्रमासाठी पैसा- प्रॉपर्टी डीलर असलेल्या बलजित सिंग शेरावत हा प्रतिभानंद याच्या संपर्कात होता. तो नेहमीच प्रतिभानंद याच्यासोबत चर्चा करत असे. तो प्रतिभानंद यांच्याकडे राहिलादेखील होता. त्याच काळात आश्रमासाठी प्रतिभानंद यांना पैशांची गरज होती. त्यानंतर त्यांचा चालक राणा आणि त्याचा साथीदार मन यांनी हत्या घडवून आणली. नितेशने 50 लाख रुपये शेरावतला अ‍ॅडव्हान्स दिले होते. त्यातील काही रक्कम प्रतिभानंद याला मिलाली.