आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहसरकार्यवाह सोनी भाजपात कायम राहणार, अडवाणींना डावलून संघाचा निर्णय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुरेश सोनी हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समन्वयक म्हणून भाजपात कायम राहतील, अशी घोषणा शुक्रवारी करण्यात आली. सोनी यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींसाठी हा जबर धक्का समजला जात आहे. सोनी हे संघाचे सहसरकार्यवाह आहेत. नरेंद्र मोदींना प्रचारप्रमुखपद देण्यामागे सोनी यांनी आपली शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे भाजपातून त्यांना हटवावे अथवा बाजूला करावे यासाठी अडवाणींनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती.

मात्र सोनी यांना बाजूला करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संघाचे प्रतिनिधी म्हणून तेच भाजपात कायम राहतील, असे संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी ट्विटरवर स्पष्ट केले आहे. येत्या काही महिन्यांत पाच राज्यांतील विधानसभा व पाठोपाठ लोकसभा निवडणूक असल्याने विद्यमान रचनेत बदल करण्याचा संघाचा विचार नाही. उलट भाजपच्या कारभारात सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह सुरैश भय्याजी जोशी हे अधिक रस घेत आहेत.