आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, गांधी घराण्याच्या या दोन सुना का येत नाही एकमेकींच्या समोर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजकारणाबाबत असे म्हटले जाते की येथे कोणीच आपला नसतो आणि कोणीच परका नसतो. गरजेनुसार संबंध तयार होतात आणि गरजेनुसार नाते तुटतात. असेच काही देशातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्यातील दोन सुनांबाबत घडले आहे. इंदिरा गांधीच्या स्नुषा सोनिया आणि मनेक या 34 वर्षांपासून एकमेकींच्या समोर देखील येत नाही. मात्र काही दिवसांपूर्वी मनेकांनी अचानक सोनिया गांधींची स्तुती केली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यासोबतच अनेकांना असाही प्रश्न पडला की या दोन्ही जाऊबाईंमध्ये असे काय घडले होते, ज्यामुळे त्या आजही एकमेकींचे नाव घेत नाही.
एक काळ होता जेव्हा सोनिया आणि मनेका एकाच छताखाली राहात होत्या. सोनियांच्या समोरच मनेका गांधी घराण्याच्या सुन आणि त्यांच्या जाऊबाई बनून घरात आल्या. दोघींमध्ये मैत्रिणीसारखे नाते होते, दोघी प्रत्येक गोष्ट एकमेकींना सांगत होत्या, मात्र असे काय घडले की आज त्यांच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाली आणि एकमेकींशी बोलणे देखिल टाळले जाते.
पुढील स्लाइडमध्ये, मनेकांनी केला होता थेट सोनियांवर शाब्दिक हल्ला