आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींविरुद्ध प्रियंका गांधी प्रचाराच्‍या मैदानात? कॉंग्रेसने फेटाळले वृत्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आगामी निवडणूकीत काँग्रेस आपला हुकमाचा एक्का प्रचारात उतरवण्याच्या तयारीत आहे. इंदिरा गांधी यांची नात आणि राजीव व सोनिया गांधी यांची मुलगी प्रियंका गांधी- वढेरा या देशभर काँग्रेसचा प्रचार करणार आहेत. मात्र, त्या निवडणूक लढवणार नाहीत, असे वृत्त प्रसार माध्‍यमांमध्‍ये पसरले होते. परंतु, हे वृत्त चुकीचे असल्‍याचे स्‍पष्‍टीकरण कॉंग्रेसने दिले आहे. यात नवे काहीच नसल्‍याचे सांगून कॉंग्रेसच्‍या प्रचार समितीचे प्रमुख अजय माकन यांनी भाजपवरच चेंगराचेंगरीची बातमी दाबण्‍यासाठी असे वृत्त पसरविल्‍याचा आरोप केला. प्रियंका गांधी यांनी यापूर्वीही कॉंग्रेसचा प्रचार अनेकदा केला आहे. त्‍यामुळे नवे काहीच नाही, असे माकन म्‍हणाले.

प्रियंका या आतापर्यंत अमेठी आणि रायबरेली या लोकसभा मतदारसंघातच प्रचार करताना दिसलेल्या आहेत. मात्र, आज सकाळपासून वृत्तवाहिन्यांवरील प्रियंक गांधीच्या प्रचाराच्या वृत्ताचे काँग्रेसच्या मीडिया सेलचे प्रमुख अजय माकन यांनी खंडन केले आहे. ते म्हणाले, 'प्रियंका अमेठी आणि रायबरेली या दोनच मतदारसंघात प्रचार करणार आहेत. मध्यप्रदेशमधील दतिया येथील दुर्घटनेवरून लक्ष विचलित करण्यासाठी असल्या अफवा पसरवल्या जात आहेत.' काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी या वृत्ताचे खंडन करण्याएवजी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

विरोधीपक्ष भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींना पुढे केले आहे. त्यांच्या विरोधात स्वतः सोनिया गांधी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचार केला आहे. मात्र, गुजरातमध्ये ते मोदींना रोखू शकलेले नाहीत. राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, प्रियंका गांधी यांना पुढे करून काँग्रेस मोदींना मोठे आव्हान निर्माण करण्याच्या तयारी आहे. ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांचे मत आहे की, प्रियंका गांधींना पुढे केल्याने राहुल यांचे वजन कमी होणार नाही तर, त्यांचा फायदा राहुल आणि काँग्रेस दोघांना होण्याची अधिक शक्यता आहे.

काँग्रेस अंतर्गत अशीही चर्चा आहे की, प्रियंका यांचा पक्षांतर्गत राजकारणात सक्रिय सहभाग नसला तरी त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग असतो. राहुल गांधी त्यांचा नेहमी सल्ला घेतात.

भाजप प्रवक्त्या निर्मला सीतारमन याबद्दल म्हणाल्या, 'हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे. मात्र, अशा घटनांमुळे काँग्रेसमधील घराणेशाही स्पष्ट होते. याआधीही त्यांनी प्रचार केला आहे. उत्तरप्रदेशमध्ये त्या प्रचार करतात.'

पुढील स्लाइडमध्ये, राहुल, सोनियांनी जिंकली फुकटातच निवडणूक !