आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sonia Gandh Fall Sick In Loksabha, Admitted In AIIMS

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'सोनियांना सभागृहातून नेताना व्‍हीलचेअर किंवा स्‍ट्रेचर का वापरले नाही?\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभेत सोमवारी अन्नसुरक्षा विधेयकातील दुरुस्त्यांवर मतदान होत असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अस्वस्थ वाटू लागले. संसदेतून रात्री सव्वाआठच्या सुमारास त्यांना थेट एम्स रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना हृदयविकार विभागात दाखल करण्यात आले. त्यांचा रक्तदाब नेहमीपेक्षा अधिक असून ईसीजी रिपोर्ट नॉर्मल आहेत. दरम्यान, सोनियांना एका औषधाची रिअँक्शन झाली असल्याचे जनार्दन द्विवेदी म्हणाले. मध्‍यरात्रीनंतर 1.30 वाजताच्‍या सुमारास सोनियांना रुग्‍णालयातून सुटी देण्‍यात आली. जवळपास 5 तास त्‍या रुग्‍णालयात होत्‍या.

तत्पूर्वी, सोनियांनी दिवसभर अन्नसुरक्षेवरील चर्चेत विरोधी पक्षांच्या आरोपांनाही उत्तर दिले. दुपारी दोनपासून त्या सभागृहात होत्या. मात्र, रात्री 8 वाजता त्या बाहेर पडल्या. सोबत राहुल होते. सोनिया लॉबीत जवळपास 15 मिनिटे बसल्या. यानंतर पुन्हा त्या संसदेतून बाहेर निघाल्या. कारजवळ पोहोचेपर्यंत त्या एकदा अडखळल्याही. कुमारी शैलजा यांनी त्यांना सावरले. तेथून सोनियांना थेट एम्समध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या अनेक वैद्यकीय तपासण्या केल्या. रविवारी त्या संसर्गजन्य तापानेही ग्रासल्या होत्या.

नरेंद्र मोदींनी उत्तम प्रकृतीसाठी सोनियांना शुभेच्‍छां देतानाच काही प्रश्‍नही उपस्थित केले.. वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...