आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Gandhi And Rahul Gandhi News In Marathi, Congress

सोनिया, राहुलची निवृत्ती नको; काँग्रेसमध्ये सूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीतील पराभवावर कॉँग्रेसमध्ये अजूनही कवित्व सुरूच आहे. परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पंजाबमधील कॉँग्रेसचे नेते जगमितसिंग ब्रार यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांनी दोन वर्षांची सुटी घ्यावी, असा सल्ला दिल्यानंतर लगेचच पक्षातील राज बब्बर, शकील अहमद आणि मनीष तिवारी हे नेते पक्षर्शेष्ठींच्या सर्मथनार्थ मैदानात उतरले. सोनिया आणि राहुल यांनी सुटीवर जाण्याची गरज नाही. त्यांचे योगदान आणि सहकार्य यांची पहिल्यापेक्षा जास्त गरज आता आहे, अशा शब्दांत त्यांनी ब्रार यांचा ‘सल्ला’ धुडकावून लावला. ब्रार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून उडालेला वादाचा भडका शमतो न शमतो तोच राज बब्बर यांनी नवीन वादंग निर्माण केले आहे. त्यांनी पराभवासाठी मंत्र्यांनाच जबाबदार ठरवले.

अहंकारामुळे पराभव
‘मंत्र्यांचा अहंकार हेच आमच्या पराभवाचे सर्वांत मोठे कारण आहे. पराभवाची जबाबदारी सर्वांनाच घ्यावी लागेल. असे राज बब्बर म्हणाले.