आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Gandhi And Rahul Gandhi News In Marathi Delhi Court

नॅशनल हेराल्ड प्रकरण: राहुल-सोनिया गांधींचे दिल्ली हायकोर्टात आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बहुचर्चित नॅशनल हेरॉल्ड गैरव्यवहारप्रकरणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पटियाळा हाऊस कोर्टाच्या आदेशाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले आहे.
 
दरम्यान, पटियाळा हाऊस कोर्टाने याप्रकरणात सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी यांना आरोपी केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांना येत्या 7 ऑगस्टला कोर्टात उपस्थित राहण्याचेही आदेश दिले आहेत. याशिवाय कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा, सॅम पित्रोदा, ऑस्कर फर्नांडिस आणि सुमन दूबे यांनाही कोर्टाने समन्स बजावले आहे. राहुल आणि सोनिया यांच्या  याच‍िकेवर पुढील शुक्रवारी सुनावणी होणार आहे.