फोटो - अॅट होम सेरेमनीमध्ये एकमेकींची गळाभेट घेताना लोकसभा सभापती सुमित्रा महाजन आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी.
नवी दिल्ली - इंडिपेंडेंस डेच्या निमित्ताने राष्ट्रपती भवनाध्ये 15 ऑगस्टच्या सायंकाळी 'अॅट होम' सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजकीय मतभेद विसरत राजकीय नेते एकमेंकांना शुभेच्छा देताना आढळून आले. या दरम्यान सर्वात खास ठरली तरी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभा अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट. सुमित्रा महाजन आणि सोनिया गांधी दोघींनी एकमेकींचे हसत स्वागत केले. कार्यक्रमात या दोघी बराच वेळ सोबत होत्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महाजन यांनी काँग्रेसच्या 25 खासदारांना निलंबित केले होते. तसेच या कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल आणि उपराज्यपाल नजीब जंग यांनीही हस्तांदोलन केले.
पाहुण्यांची मोकळेपणाने भेट
कार्यक्रमात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमात आलेल्या विरोधकांसह सर्वांची अगदी मोकळेपणाने भेट घेतली. चर्चेबरोबरच पंतप्रधानांनी त्याठिकाणी आलेल्या सामान्य नागरिकांना ऑटोग्राफही दिले. यावेळी मोदी मनमोहन सिंग आणि अरविंद केजरीवाल यांनाही भेटले. कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही सर्वांनी अगदी मोकळेपणे भेट घेतली.
कोण-कोण सहभागी ?
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपराष्ट्रपती मोहम्मह हामीद अन्सारी आणि त्यांच्या पत्नी सलमा अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन आणि केंद्रातील अनेक मंत्र्यांबरोबरच दिल्लीचे राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशिवाय देशातील प्रमुख व्यक्तींची उपस्थिती होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS